पोस्ट्स

**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू**

इमेज
**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** बार्शी तालुक्यात वर्षानुवर्षे चालणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रॅक्टिसला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय पदवी नसताना ‘प्रिन्स क्लिनिक’ चालवणाऱ्या शंकर मनोहर पाठक (उर्फ डॉ. एस. एम. पाठक) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात उपचारादरम्यान तानाजी नरहरी सुतार (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ५ मे २०२६ रोजी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार ‘प्रिन्स क्लिनिक’ची तपासणी केली. तपासणीत शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांनी ‘B.A.M.S.’ पदवी दर्शवून रुग्णांची दिशाभूल केल्याचा संशय आहे. क्लिनिकमधील औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला...

**बार्शीत मध्यरात्री महिला वकिलाच्या घरावर धाड; ‘डायल ११२’ मुळे अवघ्या ५ मिनिटांत आरोपी जेरबंद**

इमेज
**बार्शीत मध्यरात्री महिला वकिलाच्या घरावर धाड; ‘डायल ११२’ मुळे अवघ्या ५ मिनिटांत आरोपी जेरबंद**  **KDM NEWS बार्शी प्रतिनिधी** बार्शी शहरातील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या भैरवनाथ हौसिंग सोसायटी परिसरात सोमवारी मध्यरात्री एका महिला वकिलाच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरूला बार्शी पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत अटक केली. 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेच्या प्रभावी वापरामुळे अवघ्या ५ मिनिटांत पोलिसांनी घटनास्थळ गाठल्याने मोठा अनर्थ टळला आहे.            **नेमकी घटना काय?** सोमवारी (४ मे २०२६) रात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास अॅड. उज्वला ज्ञानदेव फरतडे (वय ४५)  या आपल्या घरी एकट्या असताना ही धक्कादायक घटना घडली. मध्यरात्रीच्या शांततेत एका अनोळखी इसमाने त्यांच्या घराचा दरवाजा जोराने ठोठावण्यास आणि लाथा मारण्यास सुरुवात केली. बाहेरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच अॅड. फरतडे यांनी प्रसंगावधान राखले.         **अशी झाली कारवाई** घाबरून न जाता त्यांनी तत्...

**बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निकाल** **झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी**

इमेज
**बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निकाल**   **झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी** **KDM NEWS  बार्शी (विशेष प्रतिनिधी):** बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (५ मे) अल्पवयीन मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात एका २९ वर्षीय आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी दिलेल्या या निकालामुळे केवळ चार महिन्यांत न्याय मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. १ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली. लखन ऊर्फ बापू जोतीबा सावंत (वय २९, रा. सिद्धार्थ नगर, माळशिरस) याने एका घरात चोरट्या मार्गाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने जाग आल्यावर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आरोपीला घटनास्थळाजवळच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम ३७६ व POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्य...

**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**

इमेज
**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**  **KDM NEWS प्रतिनिधी वैराग (बार्शी): मित्राला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रामाणिक सल्ला एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. "तू त्याला तक्रार करायला का सांगितलीस?" याच रागातून आरोपीने एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. वैराग शहरातील दत्तनगर परिसरात शनिवारी (२ मे) पहाटे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास वैराग येथील एका दुकानाजवळ काही मित्र मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. तिथे आरोपी उल्हास मुळे आणि दिनेश चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या उल्हासने हमालीचा लोखंडी ...

**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा**

इमेज
**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), २ मे २०२६:** बार्शी तालुक्यातील कव्हे गावात पैशाच्या वादातून दोघा आरोपींनी एका दलित मजुराला जातीवाचक शिवीगाळ करून दगड, लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण अभिमान चव्हाण (वय २९, धंदा- मजुरी, जात- हिंदू चांभार, रा. कव्हे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (१ मे २०२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कव्हे गावातील अनिल हजारे यांच्या खवा भट्टीजवळ व हनुमान विद्यामंदिर शाळेजवळ ही घटना घडली. आरोपी अनिल दत्तात्रय हजारे व आदित्य शंकर राऊत (दोघे रा. कव्हे) यांनी फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात वार करून जखमी केले आणि जवळील चाकूनेही वार केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. या घटनेत लक्ष्मण चव्हाण यांना गंभीर जखमा झाल्या...

**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**

इमेज
**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी   तालुक्यातील चिखर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन २००४-०५ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे रोजी चिखर्डे येथील संभाजीराजे भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने अवघा परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता. सकाळी ९:३० वाजता ज्या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले, त्याच जि. प. शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर संभाजीराजे भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. **गुरुजनांचा सन्मान आणि मार्गदर्शन** या सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ शिक्षक गुरव सर यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्...

**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**

इमेज
**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**  **KDM NEWS बार्शी:  प्रतिनिधी**  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ३० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बार्शीच्या कुमारी प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत महसूल विभागात 'महसूल सहाय्यक' (लिपिक-टंकलेखक) पदी आपली मोहोर उमटवली आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही आव्हानावर मात करू शकते, हे बार्शीच्या प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये प्रियांका यांनी 'महसूल सहाय्यक'  पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे बिडवे कुटुंबासह संपूर्ण बार्शी आणि परंडा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. २६१ गुणांसह 'ओपन' प्रवर्गातून यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ...