**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी**
**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी** **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** ६ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता बार्शी-धाराशिव रोडवरील कदम वस्ती (डाळ मिल जवळ) येथे भीषण रस्ता अपघात झाला. पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक **MH-12-RN-6846** ने भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने (राँग साईड) येऊन दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. अपघातग्रस्त दुचाकी क्रमांक **MH-25-AA-0516** वर गोसेवाडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील धनाजी दादाराव मस्के (सासरे) आणि त्यांच्या पत्नी रोहीणी धनाजी मस्के (सासू) होते. ते चिखर्डे (ता. बार्शी) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभातून परतत होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा जावई कुमार सुभाष अंधारे (वय ३२, रा. मानकेश्वर, ता. भुम, जि. धाराशिव) आपल्या दुचाकीवर पत्नीसह येत होता. **प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार,** कारने अत्यंत वेगात राँग साईडने येऊन धडक दिल्याने धनाजी मस्के व रोहीणी मस्के रस्त्यावर पडले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. धनाजी मस्के यांचा उजवा पाय मोडला असू...