**बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना; अजित पवार अपघातस्थळापासून अवघ्या १ किमी अंतरावर शिकाऊ विमान कोसळलं**
**बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना; अजित पवार अपघातस्थळापासून अवघ्या १ किमी अंतरावर शिकाऊ विमान कोसळलं** **KDM NEWS बारामती (प्रतिनिधी):** महाराष्ट्रातील बारामती तालुक्यात आज सकाळी पुन्हा एका भीषण विमान दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जानेवारीतील दुर्दैवी अपघातस्थळापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड एव्हिएशनच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला. सकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास दोन सीटर ट्रेनिंग एअरक्राफ्टने तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला. विमान उंची कमी असताना एका लाइट पोलला धक्का बसल्याने ते कोसळले. सुदैवाने या अपघातात विमानातील एकमेव वैमानिक जखमी झाले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. वैमानिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे बारामती विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमानाचे तुकडे परिसरात विखुरलेले असून, अपघाताचे कारण तपासण्...