**छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वैरागला १६३१ लाभार्थी समाधानी**
**छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वैरागला १६३१ लाभार्थी समाधानी** **KDM NEWS प्रतिनिधी वैराग (जि. सोलापूर):** छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत महसूल प्रशासनाने आज वैराग येथे समाधान शिबिर आयोजित केले. या शिबिरात विविध विभागांच्या एकूण **१६३१ प्रकरणांचा** निपटारा करण्यात आला. शिबिरात आधार अद्ययावतीकरण व नवीन आधार कार्ड (३८), कृषी विभागाचे २० दाखले, भूमी अभिलेख विभागाचे २५ उत्तरे वाटप, रेशन कार्ड दुरुस्तीचे १०९ प्रकरणे, आयुष्मान आरोग्य कार्ड (१२०), महिला-बाल विकास विभागाचे ७१ लाभ (३० प्रमाणपत्रे, ११ बेबी किट, ३० PMDVY योजना), पंचायत समितीच्या १० वाळू वाटप पावत्या, नगरपंचायत दाखले (४३), आरोग्य तपासणी (१८३) आणि S.T. लाभ कार्ड (१०) अशा विविध सेवांचा समावेश होता. याशिवाय सेतु केंद्राद्वारे ४३५ आणि संजय गांधी योजनेच्या २०५ अर्जांचा निपटारा झाला. १९ फेरफार निकाली काढण्यात आले, तर २७ अर्ज स्थगित ठेवण्यात आले. डिजिटल ७/१२ उतारे १६९ आणि डिजिटल ८-अ उतारे १४७ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी बार्शी पंचायत समिती उपसभापती **संतोष दादा निंबाळकर...