**शेळ्या विकून पोराच्या नोकरीसाठी दिले पैसे; रेल्वे नोकरीच्या नावाखाली बार्शीत लाखो रुपयांची फसवणूक**
**शेळ्या विकून पोराच्या नोकरीसाठी दिले पैसे; रेल्वे नोकरीच्या नावाखाली बार्शीत लाखो रुपयांची फसवणूक** **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बार्शी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांची ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष बाबू डेंगळे (वय ६२, रा. पानगाव, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेंद्र व्ही. कुलकर्णी (झरेगांवकर, रा. ढगे मळा, बार्शी) याने जानेवारी २०२५ मध्ये डेंगळे यांच्या सिव्हील डिप्लोमा झालेल्या मुलाला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला १० लाख रुपये मागणी करण्यात आली होती. नंतर ८ लाख रुपयांत तडजोड झाली. कुलकर्णीने ५ एप्रिल २०२५ पर्यंत नोकरीची ऑर्डर काढून देण्याचे सांगत ४ लाख रुपये अॅडव्हान्स मागितले. मुलाच्या भविष्यासाठी डेंगळे यांनी शेळ्या विकून आणि उसनवारी करून २० मार्चपर्यंत ४ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. नंतर कुलकर्णीने डेंगळे यांना संकेत खंडेराव पायगुडे (रा. पुणे) ...