**सोलापूर : जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा**
**सोलापूर : जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा** **सोलापूर, दि. ३० :** जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन (२९ मे) उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश कोपुरवाड आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षिरसागर, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, दंत शल्यचिकित्सक डॉ. सुवर्णा राठोड, मेट्रन विजयमाला बेले आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे समन्वयक अनिल गुंजे उपस्थित होते. **मुख्य आकर्षण :** यंदाचा विषय “Unmasking the appeal: Countering nicotine & tobacco addiction” (आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला प्रतिकार करूया) होता. **उपक्रम :** - जिल्हाधिकारी कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्...