**साताऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा : उदयनराजे भोसले यांनी केले महाराजांना अभिवादन**
**साताऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा : उदयनराजे भोसले यांनी केले महाराजांना अभिवादन** **KDM NEWS प्रतिनिधी सातारा :** शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवतीर्थ, पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज साताऱ्यातील शिवतीर्थावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, रयतेच्या कल्याणासाठी उभारलेल्या स्वराज्याची आणि न्यायनिष्ठेची आठवण करून आजच्या पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. **“महाराजांचे कार्य आजही मार्गदर्शक”** उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य केवळ राजकीय नव्हते तर रयतेच्या सर्वांगीण उन्नतीचे होते. त्यांचे शासन, न्यायव्यवस्था आणि प्रजावत्सलता ही आजही प्रत्येकासाठी आदर्श आहे. या पावन दिनी महाराजांच्या विचारांचा जागर करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य ...