**मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघड; FDAची धडक कारवाई**
**मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघड; FDAची धडक कारवाई** **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई/छत्रपती संभाजीनगर:** अन्न व औषध प्रशासन (FDA) ने मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात केलेल्या छाप्यांमध्ये दूधात भेसळ आणि बनावट दूध तयार करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. नामांकित ब्रँड्सच्या दुधात पाणी मिसळणे, व्हे पावडरचा वापर करून कृत्रिम दूध बनवणे अशा गंभीर प्रकारांमुळे घरातील लहान मुलं, वृद्धांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. मुंबई-दहिसर: ब्रँडेड दुधाची टेम्परिंग ९ जुलै २०२६ रोजी पहाटे अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेच्या युनिट-१२ च्या संयुक्त पथकाने दहिसर पूर्वेतील दुबे चाळ येथे धाड टाकली. लिंगय्या भिक्षमया गणता (४२) याला नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊच फोडून त्यात पाणी व इतर पदार्थ मिसळताना रंगेहाथ पकडले. - **जप्त/नष्ट:** ४७० लीटर भेसळयुक्त दूध (किंमत सुमारे ₹२९,७५०). - आरोपीला अटक करण्यात आली. दहिसर पोलिस ठाण्यात FIR दाखल. - दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. छत्रप...