**पुणे : विधानभवनात राज्यपालांच्या हस्ते ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे मुख्य ध्वजारोहण**
**पुणे : विधानभवनात राज्यपालांच्या हस्ते ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे मुख्य ध्वजारोहण** KDM NEWS प्रतिनिधी पुणे, १५ ऑगस्ट : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी ९.०५ वाजता विधानभवन (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी-कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्यासह ...