*₹११ ची वस्तू रुग्णालयात ₹३२५ ला; ₹६.७५ ची सिरिंज MRP ₹५७.२० – एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांतील महागडी लूट*
*₹११ ची वस्तू रुग्णालयात ₹३२५ ला; ₹६.७५ ची सिरिंज MRP ₹५७.२० – एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांतील महागडी लूट* *KDM NEWS प्रतिनिधी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणे आणि कॉन्झ्युमेबल्सच्या किमतींतील प्रचंड फरक उघडकीस आणला आहे. राज्यातील सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकड्यांनुसार रुग्णालयांना मिळणारी खरेदी किंमत (ट्रेड प्राइस) आणि रुग्णांकडून वसूल होणारी छापलेली एमआरपी यात हजारो टक्के नफा दिसून येत आहे. *सर्वेक्षणात समोर आलेले धक्कादायक आकडे - आयव्ही इन्फ्यूजन सेट (सलाईन नळी) : रुग्णालयाला मिळणारी किंमत ₹११.०५; छापलेली एमआरपी ₹३२५. यात जवळपास *२,८४१ टक्के** नफा. - सिरिंज : खरेदी किंमत ₹६.७५; एमआरपी ₹५७.२०. - कॅथेटर : खरेदी किंमत ₹२९.४१; एमआरपी ₹३१०. याशिवाय नेब्युलायझर आणि ऑक्सिजन मास्कसारख्या इतर वस्तूंमध्येही १३०० ते १६०० टक्क्यांपर्यंत मार्जिन आढळले आहे. मुंढे काय म्हणाले? तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, रुग्णालयातील बिलाचा सर्वात महागडा भाग कधीकधी रुग्णालयाशी थेट...