*बार्शीत महालक्ष्मी सणानिमित्त ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी ज्ञानमय आरास; मांजरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!*
*बार्शीत महालक्ष्मी सणानिमित्त ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी ज्ञानमय आरास; मांजरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** महालक्ष्मी सणानिमित्त धर्माधिकारी प्लॉट येथील मांजरे परिवाराच्या निवासस्थानी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी आरास साकारण्यात आली आहे. ही ज्ञानमय सजावट बार्शीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे गेल्या २५ वर्षांपासून नियमित विद्यार्थी असलेले ब्रह्माकुमार विलासभाई मांजरे (सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक) व जयश्री मांजरे यांच्या घरी ही आरास केली आहे. त्यांची स्नुषा सुजाता राहुल मांजरे यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ती साकारली. आरासीत सेवाकेंद्रातील दैनंदिन आध्यात्मिक वातावरण दाखवले आहे. राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी दीदी मुरली वाचन करीत असून गृहस्थ दांपत्ये, मातृशक्ती, बंधू, कुमार-कुमारी श्रवणासाठी उपस्थित असल्याचे दृश्य मूर्तीरूपात साकारले आहे. दीदींच्या हातातील ज्ञानमुरली विशेष आकर्षण आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र, माऊंट आबू येथील ब्रह्माबाबांची ऐतिहासि...