*बार्शीत रंगणार विद्यापीठाचा २२ वा युवा महोत्सव; २८ सप्टेंबरपासून चार दिवस कलाकुंभ*
*बार्शीत रंगणार विद्यापीठाचा २२ वा युवा महोत्सव; २८ सप्टेंबरपासून चार दिवस कलाकुंभ* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचे यजमानपद यंदा श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीला मिळाले आहे. दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महाविद्यालय परिसरात हा चार दिवसीय कलामहोत्सव संपन्न होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंचावर होईल. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर असतील. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. वी. वाय. यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाशी संलग्न सुमारे ११० महाविद्यालयांचे १५०० ते २००० विद्यार्थी ३९ कलाप्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. संगीत, नाट्य, नृत्य, ललित कला आणि साहित्य या क्षेत्रां...