**अकोला पोलिस ठाण्यात धक्कादायक प्रकार; कोठडीतील महिलेकडे मुलीची मागणी करणारा एएसआय निलंबित**
**अकोला पोलिस ठाण्यात धक्कादायक प्रकार; कोठडीतील महिलेकडे मुलीची मागणी करणारा एएसआय निलंबित** **KDM NEWS प्रतिनिधी अकोला** अकोला २ एप्रिल** – सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) राजेश जाधव याने मंगळवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पोलीस कोठडीतील एका महिला आरोपीकडे ‘तुझ्या मुलीला एक रात्र माझ्याकडे पाठव, १० हजार रुपये देतो’ अशी अश्लील मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ कारवाई करत जाधव यांना निलंबित केले असून, त्याच्यावर विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एएसआय सध्या फरार असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, ८० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या (सायबर फ्रॉड) प्रकरणात अकोला सायबर सेलने मुंबई-पालघर परिसरातून एका महिलेसह पुरुष आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने महिलेला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याने तिला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एएसआय राज...