**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा**
**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा** **KDM NEWS प्रतिनिधी**नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याने बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्याच्या आणखी एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत उघडकीस आले की, खरात ‘तुर्की मध’च्या नावाखाली शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक मध विकत होता. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, अत्यंत दुर्मिळ आणि लैंगिक शक्ती वाढवणारा असल्याचा बनावट दावा करून तो एका किलोच्या बाटलीला तब्बल ९ लाख रुपये घेत होता. खरातने या मधाला ‘एल्विश हनी’ असे ब्रँड नाव दिले होते. तो ग्राहकांना सांगत असे की, हा मध फक्त तुर्कीच्या विशिष्ट समुद्री गुहेतून मिळतो आणि त्यात अशी औषधी शक्ती आहे की, लैंगिक अडचणी, शारीरिक अशक्तपणा दूर होतो. मुख्यतः उद्योजक, राजकीय नेते आणि उच्चभ्रू भाविकांना हे मध विकले जात होते. अनेक जण लैंगिक समस्या सोडवण्यासाठी खरातकडे येत आणि तो या मधाची शिफारस करत असे. चौकशीत समोर आले की, मधात काही औषधी गोळ्या मिसळून तो विकला जात होता. ...