पोस्ट्स

**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई२१.४३९ किलो गांजा जप्त; सराईत आरोपी रजाक शेख अटकेत**

इमेज
**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई २१.४३९ किलो गांजा जप्त; सराईत आरोपी रजाक शेख अटकेत**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ३० – सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या विक्री आणि लागवडीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला थोबडे वस्ती, जुना देगांव नाका परिसरात संशयास्पद इसम दिसला. तो झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून गांजाच्या पुड्या विक्री करत होता. पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीतून २२७ ग्रॅम गांजा सापडला. चौकशीत आरोपीने आपले नाव रजाक गफुर शेख (वय ४९, रा. थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि ५९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१.२१२ किलो होते. पिशवीतील गांजासह एकूण २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात...

**शिवव्याख्याते, वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे भीषण अपघातात निधन**

इमेज
**शिवव्याख्याते, वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे भीषण अपघातात निधन**  **KDM NEWS प्रतिनिधी नांदेड : मराठा सेवा संघाचे प्रबोधनकार आणि वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष, प्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनक शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांचा मंगळवारी सिडको नांदेड चौकात (ढवळे कॉर्नर) भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. नांदेडहून परतताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की महाराजांना गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच प्राणज्योत मालवली. बारूळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथील भूमिपुत्र मधुकर महाराज बारुळकर हे संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधन, कीर्तन आणि मराठा समाजाच्या एकतेच्या कामासाठी ओळखले जातात. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा प्रचार करणारे आणि वारकरी परिषदेच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले महाराज अहोरात्र समाजजागृतीसाठी कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने वारकरी संप्रदाय, मराठा समाज आणि कीर्तन विश्वावर शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरांवरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्या...

**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी**

इमेज
**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) शिवारात के. आर. अॅग्रो प्रायव्हेट कंपनीच्या परिसरातील २०० केव्हीए क्षमतेच्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि ५०० किलो अॅल्युमिनियम वायडिंग वायर चोरून नेल्याने महावितरण कंपनीला १ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २७ मार्च दुपार ते ३० मार्च सायंकाळी दरम्यान घडली. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचे तेल आणि वायर काढून नेले. यातील ऑइलची किंमत अंदाजे २० हजार रुपये तर अॅल्युमिनियम वायरची किंमत १ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या बार्शी ग्रामीण २ विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीकृष्ण भगवान चाटे (वय ४०) यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षका...

**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान**

**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान** सातारा : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत असताना सातारा जिल्ह्यातही सोमवारी दुपारीपासून मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटी, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यामुळे वाई आणि खंडाळा तालुक्यांत वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. यात एका २९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण ३४ मेंढ्या ठार झाल्या. एक मेंढपाळ जखमी झाला. जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी, फलटण या तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील आसले गावाच्या पांडवनगर परिसरात दुपारी शेतात मेंढ्या चरणाऱ्या कळपावर वीज कोसळली. यात १६ मेंढ्या जागीच ठार झाल्या. मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ यांना विजेचा झटका बसून जखमी झाले. त्यांना वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचबरोबर खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावाच्या सोलाडी शिवारात अमोल धायगुडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर संध्याकाळी वीज पडली. यात ९ शेळ्या ठार झाल्या. या दोन घटनांमुळे धायगुडे यांचे सुम...

**महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**

इमेज
**महाराष्ट्रत गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**  **KDM NEWS प्रतिनिधी अकोला : राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे लागलेल्या रांगेत उभे असताना अन्वी मिर्जापूर (ता. अकोला) येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा शनिवारी दुपारी अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. शिरसाट हे सकाळपासून अकोला शहरातील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर आपल्या विधवा सूनेच्या गॅस बुकिंगसाठी रांगेत उभे होते. तासन्तास भीषण उन्हात आणि गर्दीत प्रतीक्षा केल्याने थकवा आला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अन्वी मिर्जापूर गावात शोककळा पसरली असून, गॅस वितरणातील गोंधळ आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ग्रामस्थांचा संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या दुर्दैवी घटनेला ‘गॅस टंचाईचा पहिला बळी’ म्हटले आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. KDM NEWS प्रतिनिधी 

*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**

इमेज
*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर **सोलापूर येथील हरीभाई प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील पैलवान सोनाली मंडलिकला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. सांगलीच्या अपेक्षा पाटीलकडून तिला पराभव झाला. मध्यंतराला सोनाली २-० ने आघाडीवर होती, मात्र शेवटच्या टप्प्यात अपेक्षा पाटीलने जोरदार पलटवार करत विजय मिळवला. या पराभवानंतर ओपन गटात निवड न झाल्याने सोनाली प्रचंड निराश झाली. तिने लगेचच सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत कुस्तीला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव, योग्य आहार न मिळणे आणि ६५ किलोपेक्षा वजन वाढवता न आल्याने ओपन गटात संधी गमावल्याची खंत तिने व्यक्त केली. सोनाली मंडलिक ही सामान्य कुटुंबातील खेळाडू आहे. कापरेवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीतून तिने कुस्तीला सुरुवात केली. कोणत्याही...

**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**

इमेज
**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुक्यातील पांगरी गावात एका आईने आपल्या दोन लहान मुलांवर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ महिन्यांच्या मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आली, तर ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक वार केले गेले. या कृत्यानंतर आरोपी मातेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पांगरी येथील या घरात सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बार्शी तालुका हादरला आहे. माता आपल्या दोन्ही मुलांवर एकाच वेळी हल्ला करून नंतर स्वतःला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. स्थानिकांनी तत्काळ मदत करत पोलिसांना कळवले. पांगरी पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती ताब्यात घेतली. दोन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, तर ६ वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मातेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अ...