**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ**
**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ** ** KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, १ एप्रिल २०२६: २०११ नंतर प्रथमच आजपासून भारताची जनगणना सुरू होत आहे. ही १६वी राष्ट्रीय जनगणना असून, ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. केंद्र सरकारने दोन टप्प्यांत जनगणना घेण्याचे जाहीर केले आहे. पहिला टप्पा (घर-सूचीकरण आणि आवास जनगणना) आज १ एप्रिलपासून सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालेल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या सोयीनुसार या कालावधीत ३० दिवसांचा कालखंड निवडेल. दुसरा टप्पा (लोकसंख्या गणना) फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. पहिल्या टप्प्यात घराची स्थिती, सुविधा आणि घरगुती मालमत्ता याविषयी **३३ प्रश्न** विचारले जातील. ही जनगणना पहिल्यांदाच मोबाइल अॅपद्वारे (ऑफलाइन काम करणारे, १६ भाषांत उपलब्ध) घेतली जाणार आहे. सुमारे ३० लाख गणक घराघरात जाऊन माहिती घेतील. नागरिकांना स्व-गणना (सेल्फ-एन्युमरेशन) पोर्टलवर १५ दिवस आधी स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही कागदपत्र दाखवण्याची गरज नाही. सर्व माहिती गोपनीय राहील आणि फक्त विकास नियोजनास...