पोस्ट्स

**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त**

इमेज
**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ), १७ एप्रिल २०२६:** बार्शी-मालवंडी रोडवरील मौजे बळेवाडी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री १२.३० वाजता सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दंगा नियंत्रण पथकाने छापा टाकला. अंगावर तोकडे कपडे घालून १८ महिला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले. बार मालक, मॅनेजर आणि ९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ठिकाणावरून १० नकली नोटांचे बंडल, लोखंडी तलवार, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, १३ वाहने, ४२ हजार रुपयांची रोख रक्कम, साऊंड सिस्टम, अम्प्लिफायर आणि २६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले. पोलीस अंमलदार रहिम अलादीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ एप्रिल रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकातील पोकॉ/६७७ सचिन सपाटे, पोकॉ/४५८ बुद्धभूषण खरात, पोको ४७८ आकाश पाचकुडवे, मपोकॉ/१५१९ निशा उइके आणि चालक पोकॉ/डी.६३ पवार यांच्यासह पथक बारमध्ये दाखल झाले. आत ...

**घरी बायकोला काय तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ?' सिलिंडर मिळत नसल्यानं नवऱ्याचा संयम सुटला; एजन्सीसमोरच डोकं फोडून घेतलं**

इमेज
**छत्रपती संभाजीनगर : 'घरी बायकोला काय तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ?' सिलिंडर मिळत नसल्यानं नवऱ्याचा संयम सुटला; एजन्सीसमोरच डोकं फोडून घेतलं**  **KDM NEWS प्रतिनिधी रांजणगाव (छत्रपती संभाजीनगर) :** घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईने सामान्य माणूस किती हतबल होऊ शकतो, याचा थरारक अनुभव वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथे समोर आला. कमल गॅस एजन्सीसमोर ५० वर्षीय बालचंद नेमाने यांनी संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. मागील काही दिवसांपासून बालचंद नेमाने (रा. रांजणगाव) घरगुती सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीचे उंबरठे झिजवत होते. वारंवार चकरा मारूनही सिलिंडर मिळत नव्हता. गुरुवारी दुपारी ते पुन्हा एजन्सीवर गेले. तेथे सिलिंडर उपलब्ध नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा संयम सुटला. 'किती दिवस चकरा मारायच्या? हक्काचा गॅस मिळत नसेल तर घरी जाऊन बायकोला काय उत्तर देऊ?' असा सवाल करत त्यांनी एजन्सी आवारातच स्वतःला दुखापत करून घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नेमाने यांना पाहून उपस्थित लोकां...

**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**

इमेज
**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्ह्यातील १७ धर्मादाय रुग्णालयांमधील गरजू, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. यासोबतच प्रत्येक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आरोग्य मित्र (आरोग्य सेवक) यांचे नाव, संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक व तक्रार निवारण क्रमांक असलेला डिस्प्ले बोर्ड १५ दिवसांत लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियोजन भवन सभागृहात झालेल्या धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख, भागवत फुलसुंदर, समिती सदस्य व सर्व रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. सूर्यवंशी म्हणाले, “राज्य शासनाच्या विधी व न्या...

**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**

इमेज
**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि नंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपीने तिला दोन महिन्यांची गर्भवती असताना पुण्यात नेले आणि स्वतःच्या घरात जबरदस्तीने गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) याने मे-जून २०२४ पासून २ मार्च २०२६ पर्यंत तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले. त्यानंतर बार्शी येथील एका लॉजमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिला गर्भधारणा झाल्याचे समजले, तेव्हा आरोपीने तिला पुणे येथे नेले आणि आपल्या राहत्या ठिकाणी एम.टी.पी. संदर्भातील औषधे जबरदस्तीने दिली. या घटनेसंदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठा...

**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून घारी येथे पुरस्कार वितरण**

इमेज
**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून घारी येथे पुरस्कार वितरण**  **KDM NEWS प्रतिनिधी घारी (बार्शी) | १५ एप्रिल २०२६**भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी मौजे घारी, बार्शी तालुका येथे जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ‘ध्येय जनस्वराज्याचे, मानवतेचे हक्काचे’ असे ब्रीदवाक्य असलेल्या फाउंडेशनने विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांचा सन्मान करून कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी, सरपंच नंदकुमार काशीद, सूर्यकांत देशमुख आणि जनस्वराज्य फाउंडेशनचे संचालक दशरथ उकिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, घारी येथे झालेल्या या सोहळ्यात फाउंडेशन संचालक दशरथ उकिरडे यांनी सांगितले की, महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे. **पुरस्कार विजेते :** - **कलारत्न पुरस्कार** : बार्शी तालुक्यातील अभिनेते व दिग्दर्शक मह...

**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**

इमेज
**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर - महाराष्ट्र शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस २०२०) यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व आयटीडीपी अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन (आयएएस २०२२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या मालिकेत हा तिसरा मोठा बदल आहे. कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. अनुकंपा भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवून त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला. शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली. या यशस्वी कामगिर...

**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी**

इमेज
**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी**  **KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर (दि. १५ एप्रिल २०२६):** आषाढी शुद्ध एकादशी सोहळा यंदा २५ जुलै २०२६ रोजी साजरा होणार असून, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसह अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक पंढरपूरला येणार आहेत. या सोहळ्यात भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गर्दी व्यवस्थापन सुरळीत व्हावे आणि पायाभूत सुविधा सक्षम व्हाव्यात, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (६५ एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप, नदीपात्र, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप, विसावा मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. पाहणीवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळा आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालये आदी बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. भक्ती सागर येथेही भाविका...