**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त**
**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या खांडवी बीट अंमलदार मदतनीस पोकॉ/१२१९ नागनाथ वैजिनाथ आंधळे यांच्या नेतृत्वाखालील रात्रगस्त पथकाने आज १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०३.१५ वाजता हॉटेल स्वामिनीसमोर (बार्शी-कुडूवाडी रोड, मौजे शेंद्री शिवार) एका बिननंबरच्या मोटरसायकलवरून फिरत असलेल्या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल, एक तलवार व तीन कोयते असा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रात्री ११ वाजता सुरू झालेल्या कोंबींग ऑपरेशन व रात्रगस्तीदरम्यान शेंद्री फाटा ते बार्शी दरम्यान गस्त घालत असताना संशयास्पद मोटरसायकल दिसली. पथकाने पाठलाग करत हॉटेल स्वामिनीसमोर ती थांबवली. चौकशीत दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची झडती घेण्यात आली. पंचांसमक्ष झालेल्या झडतीत त्यांच्याकडून खालील वस्तू हस्तगत झाल्या : एक लोखंडी बॉडीचे पिस्तुल (बॅरलवर नक्षी, काळी ग्रीप, मॅगजिनसह, लांबी १७ सेमी, उंची १२ सेमी) किंमत २०,००० रुपये. एक लोखंड...