पोस्ट्स

**परांडा रोड भोसरे येथे कुटुंबावर कोयता व लोखंडी गजाने हल्ला; आई-मुलगा गंभीर जखमी**

इमेज
**परांडा रोड भोसरे येथे कुटुंबावर कोयता व लोखंडी गजाने हल्ला; आई-मुलगा गंभीर जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी कुर्डूवाडी** माढा तालुक्यातील परांडा रोड भोसरे येथे घराजवळ फिरत असल्याच्या कारणावरुन दोघा तरुणांनी कुटुंबीयांवर कोयता व लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना १६ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात आई शोभा बबन भोसले व मुलगा रणजित बबन भोसले गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादी रणजित बबन भोसले (वय २०, व्यवसाय - पान टपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो व त्याचा मित्र उदय यांच्याशी रात्री वॉकिंगवरुन परतत असताना दुर्योधन कंगड्या काळे व शुभम उर्फ नकल्या कंगड्या काळे (दोघेही रा. परांडा रोड भोसरे) यांनी त्यांना रोखले. "तुम्ही आमच्या घराजवळ का फिरता?" असे विचारुन शिवीगाळ व मारहाण केली. रणजितने लगेच भाऊ ज्ञानेश्वर व आईला फोन करुन बोलावले. कुटुंबीय (ज्ञानेश्वर, शोभा, वहिनी आर्या, बहिण रेणुका) घटनास्थळी आल्यावर वाद वाढला. दोन्ही आरोपी घरी जाऊन शुभमने कोयता व दुर्योधनने लोखंडी गज घेऊन परतले. त्यांनी वहिनी आर्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आर...

**इंटरनेट फार्मसीविरोधात बार्शीत औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद**

इमेज
**इंटरनेट फार्मसीविरोधात बार्शीत औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) आवाहनानुसार आज बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी बार्शी तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद आहेत. इंटरनेट फार्मसीच्या अनधिकृत ऑनलाइन औषध विक्रीविरोधात हा एकदिवसीय संप सुरू आहे. बार्शी शहरासह संपूर्ण तालुक्यात सकाळपासून औषध विक्रेते बंद आंदोलनात सहभागी झाले असून, बहुतेक सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद दिसत आहेत. सोलापूर जिल्हा केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने यापूर्वीच प्रशासनाला सूचित केले होते. **इमर्जन्सी सेवेसाठी उपलब्ध मेडिकल्स**   अत्यावश्यक रुग्णांच्या सोयीसाठी खालील हॉस्पिटलमधील मेडिकल्स चालू ठेवण्यात आले आहेत: 1. डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल मेडिकल - ७०२०२५१५५३   2. सुविधा हॉस्पिटल मेडिकल - ९९७०७६५३३०   3. महालक्ष्मी मेडिकल, डॉ. अंधारे हॉस्पिटल - ९४२०७५४००३   4. श्री समर्थ मेडिकल, डॉ. पडवळ हॉस्पिटल - ९३७२१४०५८६   5. प्रगती मेडिकल, डॉ. सोमानी हॉस्पिटल - ९९२१०५१५०४   6. शिव...

**पेट्रोल-डिझेल संपुष्टात येणार? भुजबळांनी वाढवली नागरिकांची धास्ती**

इमेज
**पेट्रोल-डिझेल संपुष्टात येणार? भुजबळांनी वाढवली नागरिकांची धास्ती** **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० मे २०२६:** राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभा परिसरात केलेल्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात उपलब्ध असलेला पेट्रोल आणि डिझेलचा साठा केवळ **एक महिना** पुरेल एवढाच आहे. भुजबळ म्हणाले, “आमच्याकडे सध्या फक्त एक महिन्याचा साठा शिल्लक आहे. केरोसीनचा साठा मुबलक आहे, परंतु वाटप व्यवस्था बिघडली आहे. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात येत आहेत.” त्यांनी नागरिकांना घाबरून अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहनही केले आहे. या विधानानंतर राज्यभरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, परभणीसह ग्रामीण भागात अनेक पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी “नो स्टॉक”चे फलक लावण्यात आले आहेत.          जागतिक कारण मध्यपूर्वेतील वाढता तणाव, विशेषतः इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यांमुळे कच्च...

**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले**

इमेज
**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले**  **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० मे २०२६ :** चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राहुल विठ्ठल शिंदे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात पकडले. इयत्ता ११वी व १२वी वर्गांसाठी प्रथम मान्यता देण्याची फाईल क्लिअर करण्यासाठी त्याने १.५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संस्थेची ११वी-१२वी मान्यतेची फाईल गेल्या काही महिन्यांपासून चर्नी रोड कार्यालयात प्रलंबित होती. शिंदे याने फाईल पुढे सरकवण्यासाठी १.५ लाख रुपयांची मागणी केली. नियमाप्रमाणे काम व्हायला हवे असतानाही लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी वरळी येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. ACB पथकाने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्यावर सापळा रचण्यात आला. आज तक्रारदार १.५ लाख रुपये घेऊन कार्यालयात गेला. शिंदे याने रक्कम स्वीकारताच ACB अधिकाऱ्यांनी ...

**बार्शीत ७५० लिटर अवैध हातभट्टी दारूचा सुळसुळाट! टेम्पोसह चालक अटक**

इमेज
**बार्शीत ७५० लिटर अवैध हातभट्टी दारूचा सुळसुळाट! टेम्पोसह चालक अटक** **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (१९ मे २०२६) रात्री ११ वाजता फपाळवाडी शिवारात (बार्शी-शेलगाव रोड) सापळा लावून एका टेम्पोमधून ७५० लिटर अवैध हातभट्टी दारू जप्त केली. टेम्पोसह एकूण सुमारे ४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोपनीय बातमीवरून पोलीस उपनिरीक्षक बालाजी पळसने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने व पथकातील कर्मचारी राहुल र्बोदर  यांनी रोडवरील गतिरोधकावर वाहन तपासणी सुरू केली होती. यावेळी राखाडी रंगाचा अशोक लिलँड टेम्पो क्र. MH-13-DQ-4813 आढळला. तपासणी केली असता मागील हौद्यात १५ काळ्या रबर ट्यूबांमध्ये भरण्यात आलेली ७५० लिटर (प्रत्येक ट्यूब ५० लिटर) हातभट्टी दारू सापडली. दारूचा तीव्र आंबट वास येत होता. टेम्पो चालक अविनाश प्रकाश पवार (वय २७, रा. तांबेवाडी, यमाई तांडा, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष टेम्पोची तपासणी करून दारू व वाहन जप्त करण्यात आले. **जप्त मुद्देमाल :** - हातभट्टी दारू : ७५...

**नॉर्वे दौऱ्यात मोदी-स्टोरे संयुक्त पत्रकार परिषद विवादात; नॉर्वेजियन पत्रकार हेल्ले लिंग सोशल मीडियावर चर्चेत**

इमेज
**नॉर्वे दौऱ्यात मोदी-स्टोरे संयुक्त पत्रकार परिषद विवादात; नॉर्वेजियन पत्रकार हेल्ले लिंग सोशल मीडियावर चर्चेत**  **KDM NEWS प्रतिनिधी ओस्लो (नॉर्वे):** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान नॉर्वेजियन पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तर सत्र न घेतल्याने वाद निर्माण झाला. या घटनेनंतर नॉर्वेजियन पत्रकार हेल्ले लिंग (Helle Lyng Svendsen) यांचे नाव सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. सोमवारी (१८ मे २०२६) ओस्लोमध्ये दोन्ही नेत्यांनी संयुक्त विधान केले. यानंतर प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्याने हेल्ले लिंग यांनी उभे राहून मोठ्याने विचारले, “पंतप्रधान मोदी, जगातील सर्वात मुक्त पत्रकारितेच्या देशातून काही प्रश्न घेणार नाहीत का?” मोदी यांनी काही प्रतिसाद न देता स्टोरे यांच्याशी हस्तांदोलन करून सभागृह सोडले. हेल्ले लिंग यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नॉर्वे विश्व पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असल्याचे तर भारत १५७व्या स्थानावर असल्याचे नमूद केले. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

**NEET-UG २०२६ पेपर लीक: लातूरमध्ये डॉक्टरच्या घरी CBI धाड, कोचिंग सेंटरचा मालकही अडकला**

इमेज
**NEET-UG २०२६ पेपर लीक: लातूरमध्ये डॉक्टरच्या घरी CBI धाड, कोचिंग सेंटरचा मालकही अडकला** **KDM NEWS प्रतिनिधी लातूर (प्रतिनिधी) :** NEET-UG २०२६ परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात सीबीआयने लातूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. परीक्षेच्या १० दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या संशयावरून एका डॉक्टरच्या घरी सीबीआयच्या पथकाने धाड घातली. या ठिकाणी सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली.  सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरमधील काही नामवंत डॉक्टरांनी कथितरित्या लीक झालेला पेपर खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रेनुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) या प्रसिद्ध कोचिंग सेंटरशी संबंधित या प्रकरणात CBI ची टीम लातूरमध्ये सक्रिय आहे. कोचिंग सेंटर चालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या मोबाइलवरून लीक पेपर आणि उत्तरकुंजी आढळून आल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिलला आरोपींना पेपर मिळाला होता, तर परीक्षा ३ मे रोजी झाली. या प्रकरणात सीबीआयने आधीच काही अटक केल्या आहेत. लातूरमधील डॉक्टर आणि कोचिंग क्षेत्रातील व्यक्तींना या गँगशी संबंध...