**बार्शी : डॉ. संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलचा नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस**
**बार्शी : डॉ. संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलचा नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर : बार्शी येथील गट क्र. ८३९, अलीपुर रोडवरील सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांनी डॉ. संजय श्रीधर अंधारे यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या स्वाक्षरीने १८ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, श्री. संदीप चतुर्भुज सुतार यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या तक्रारीनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथील वैद्यकीय अधीक्षकांनीही या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. **मुख्य उल्लंघने :** - बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अंतर्गत अग्निशमन विभागाचे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) सादर न केल्याचे आरोप आहेत. - जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र सादर न केल्याचेही निदर्शनास आले आहे. - मुंबई उच्च न्यायालयात...