पोस्ट्स

**सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; सात दिवसांचा बफर स्टॉक उपलब्ध**

इमेज
**सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; सात दिवसांचा बफर स्टॉक उपलब्ध**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २६ मे:** जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत ठेवण्यासाठी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांना जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात पाच ते सात दिवस पुरेल इतका बफर स्टॉक उपलब्ध असून, नियमित पुरवठाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २५ मे रोजी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले, “काही पेट्रोल विक्रेत्यांवर कंपन्यांनी एकतर्फी विक्री मर्यादा घातल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय असे कोणतेही बंधन घालू नये.” अशा बंधनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ग्रामीण भागातही मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. CNG पुरवठ्यातही वाढ करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या. **पंढरपूर येथे जिल्हाधि...

**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते; पैशांची मागणी, सायबर सेलकडे तक्रार**

इमेज
**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते; पैशांची मागणी, सायबर सेलकडे तक्रार**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. २५ मे :** सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यामार्फत काही नागरिकांकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे बनावट खाते **व्हिएतनाम** आणि **थायलंड** येथून तयार करण्यात आले असून, त्यात “Collector & District Magistrate” असे पदनाम दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी स्वतः सोलापूर सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बनावट खात्यांमधून पाठवलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत आणि संशयास्पद संदेश ...

**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा**

इमेज
**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे तालुक्यातील रासायनिक खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांसोबत महत्वाची आढावा बैठक झाली. या बैठकीत खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी युरिया, डीएपी, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा ठेवून वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, खत-बियाणे विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते.बैठकीत शेतकरी हिताला प्राधान्य देत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बार्शी तालुक्यात कुठेही खत, बियाणे किंवा औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन आणि विक्रेत्यांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. **बोगस माल विक्रीवर कारवाई**   बैठकीत बोगस बियाणे, मुदतबाह्य औषधे आणि खतांसोबत जबरदस्तीने इतर माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक दुकानात MRP दर फल...

**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा**

**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा** **बार्शी (सोलापूर) :** कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे तालुक्यातील रासायनिक खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांसोबत महत्वाची आढावा बैठक झाली. या बैठकीत खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी युरिया, डीएपी, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा ठेवून वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, बाजार समिती सभापती विजय गरड, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, खत-बियाणे विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकरी हिताला प्राधान्य देत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बार्शी तालुक्यात कुठेही खत, बियाणे किंवा औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन आणि विक्रेत्यांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. **बोगस माल विक्रीवर कारवाई**   बैठकीत बोगस बियाणे, मुदतबाह्य औषधे आणि खतांसोबत जबरदस्तीने इतर माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर क...

**बार्शीत थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यात पत्नीची धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या**

इमेज
**बार्शीत थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यात पत्नीची धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :**बार्शी शहरात आज एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या २६ वर्षीय पत्नीची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना सोमवारी (२५ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास बार्शी-परांडा रोडवरील प्रवीण हॉटेलजवळ घडली. **धनश्री ऋषीकेश पाटील (वय २६, रा. बार्शी)** असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत धनश्रीचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  **बचत गटाचे काम करून परततानाच गाठले** मिळालेल्या माहितीनुसार, मृत धनश्री पाटील ही महिला बचत गटात काम करत होती. सोमवारी सकाळी ती बचत गटाचे काम आटोपून लक्ष्याचेवाडी येथून आपल्या जुपीटर स्कुटीवरून (क्र. MH13-FA-4016) बार्शीकडे परत येत होती. दरम्यान,...

**सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले; १,२८७ किलो विकूनही शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा**

इमेज
**सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले; १,२८७ किलो विकूनही शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैना होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. एका शेतकऱ्याने १,२८७ किलो कांदा विक्रीस आणला, मात्र वाहतूक, हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा जाता उलट ३०१ रुपये स्वतःच्या खिशातून द्यावे लागले. शशिराव तोदेकर (मंगळवेढा तालुका) यांनी १,२८७ किलो कांदा बाजारात आणला. त्याला केवळ १,४६८ रुपये मिळाले. हमाली, तोलाई आणि वाहनभाडे मिळून एकूण १,७६९ रुपये खर्च आला. परिणामी शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा सोसावा लागला. हा प्रकार सामान्य झाला आहे. सोलापूर बाजारात सध्या कांद्याचे दर प्रति किलो १ ते ८ रुपये एवढेच फिरत आहेत. काही ठिकाणी ५० पैशांपर्यंत घसरले आहेत. मोठ्या प्रमाणात कांदा आगमन, निर्यात मंदावणे आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रति किलो १८ ते २० रुपये एवढा असताना मिळणारा भाव त्यापेक्षा कितीतरी कमी आहे. शेतकरी संघटनां...

**धाराशिव : चालत्या ट्रकमधून मेंढ्या-शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा डाव फसला; पोलिसांनी २४ तासांत सहा आरोपींना अटक**

इमेज
**धाराशिव : चालत्या ट्रकमधून मेंढ्या-शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा डाव फसला; पोलिसांनी २४ तासांत सहा आरोपींना अटक**  **KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव : सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकवर चढून शेळ्या-मेंढ्या चोरण्याची हॉलिवूडपटासारखी घटना घडली. एका कारचालकाने हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद केला आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने धाराशिव पोलिसांना मोठी यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा आणि येरमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत टोळीचा भेदाफोड करत सहा आरोपींना जेरबंद केले. यावेळी चोरीला गेलेल्या मेंढ्या-शेळ्यांसह सुमारे २.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. **घटना कशी घडली?**   महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागे आरोपी चढला. त्याने एक एक करून शेळ्या-मेंढ्या खाली फेकल्या. खाली दुचाकीवर थांबलेल्या साथीदारांनी त्या पकडल्या. शेळ्या ओरडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडात काटे टोचण्याची क्रूर पद्धतही वापरण्यात आली. हा धाडसी प्रकार दिवसाढवळ्या घडला. दुसऱ्या दिवशी देखील अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धार...