**महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा न दाखल करण्यासाठी ५० हजार लाच; दोन पोलिस रंगेहाथ जाळ्यात**
**महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा न दाखल करण्यासाठी ५० हजार लाच; दोन पोलिस रंगेहाथ जाळ्यात** **KDM NEWS प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :** मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलने महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सायंकाळी दोघांना रंगेहाथ अटक केली. लाचेची पहिली उचल म्हणून १० हजार रुपये स्वीकारल्यानंतर दोघांना ठाण्याच्या आवारातच बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. **आरोपी :** - संजय नागूसिंग बहुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी पोलीस ठाणे) - गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३, पोलीस अंमलदार/कॉन्स्टेबल, मुकुंदवाडी पोलीस ठाणे) **घटनाक्रम :** २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात एका मुलीशी झालेल्या वादाची तक्रार आली होती. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने वाद मिटला होता. तरीही बहुरे आणि खटावकर यांनी विद्यार्थ्याला धमकी दिली क...