**FDA ने उघडला मोठा ग्लोव्हज घोटाळा; मलेशियातून विनापरवाना आयात, BMC व सरकारी रुग्णालयांना नॉन-स्टेराइल ग्लोव्हजचा पुरवठा**
**FDA ने उघडला मोठा ग्लोव्हज घोटाळा; मलेशियातून विनापरवाना आयात, BMC व सरकारी रुग्णालयांना नॉन-स्टेराइल ग्लोव्हजचा पुरवठा** **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई :** महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) ने मुंबई, भिवंडी आणि पालघर येथे छापेमारी करून विनापरवाना मलेशियातून आयात केलेल्या नॉन-स्टेराइल सर्जिकल ग्लोव्हजचा मोठा गैरप्रकार उघड केला आहे. या प्रकरणात सरकारी रुग्णालयांसह मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना बनावट स्टेराइल ग्लोव्हज पुरवठा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. एकूण २ कोटी १७ लाख रुपयांचा वैद्यकीय साठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने प्रथम मुंबईतील साकीनाका येथील मे. साची मेडिक या आस्थापनावर छापा टाकला. या कंपनीने मलेशियातून कोणत्याही आयात परवान्याशिवाय लाखो नॉन-स्टेराइल सर्जिकल ग्लोव्हज आणले होते. या ग्लोव्हजचे भिवंडी आणि वाडा (पालघर) येथे पॅकिंग व लेबलिंग करून सरकारी रुग्णालयांना विक्री करण्यात येत होते. साकीनाका गोदामातून ७४.८५ लाख रुपयांचा ग्लोव्हज साठा जप्त करण्यात आला. तपासात उघडकीस आले की, या कं...