पोस्ट्स

**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**

इमेज
**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**  KDM_NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, ७ ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीला शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांसह पक्षीय खासदार उपस्थित होते. भेटीत उद्धव ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांसोबत विशेष संवाद झाला. पंतप्रधान मोदींनी ब्रेकफास्ट बैठकीत या खासदारांना थेट आश्वासन दिले, “काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे.” त्यांनी सांगितले की, एनडीए एक परिवार आहे. प्रत्येक खासदाराला सन्मान दिला जाईल आणि संधी मिळेल. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधा, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला. मोदींनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबत विशेष चौकशी करत आरोग्याची...

**शेलगाव मा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको; थकीत पीक विमा व कर्जवसुली नोटिसांविरोधात आंदोलन**

इमेज
**शेलगाव मा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको; थकीत पीक विमा व कर्जवसुली नोटिसांविरोधात आंदोलन** #KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ६ ऑगस्ट : पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ अंतर्गत थकीत विमा रक्कम तत्काळ मिळावी आणि राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही बँकांकडून पाठवल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुली नोटिसा थांबवाव्यात, या मागण्यांसाठी बार्शी तालुक्यातील शेलगाव मा येथे आज शेतकऱ्यांनी तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. #आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विकास बारबोले यांनी सांगितले की, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही बँका शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून मानसिक त्रास देत आहेत. तसेच २०२५ चा हक्काचा पीक विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुसा मुलाणी, हनुमंत भोसले व युवासेनेचे जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील काळात तीव्र आंदोलन ...

**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी**

इमेज
**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ) – फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीला भुलून बार्शीतील एका ६३ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाख ९५ हजार ५७६ रुपये २० पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी मोहन जगन्नाथ गायकवाड (वय ६३, रा. १२८३ कसबा पेठ, एकविराई मंदिराजवळ, बार्शी) हे निवृत्त पेन्शनर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना “२७ Acume” या नावाची शेअर मार्केटसंदर्भातील जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना “२७ Acume Stock Capital” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधून दररोज ५ ते २५ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवत “Acume Pro App” डाउनलोड करण्यास सांगितले. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे ट्रेडिंग ...

**बार्शी_पोलिसांचा_मोठा दणका! ३१ लाखांच्या रेशनच्या धान्यासासह ४ आरोपी जेरबंद**

इमेज
**बार्शी_पोलिसांचा_मोठा दणका! ३१ लाखांच्या रेशनच्या धान्यासासह ४ आरोपी जेबंद**  KDM_NEWS_प्रतिनिधी बार्शी, ७ ऑगस्ट : गोरगरीबांसाठी शासनाकडून मोफत पुरवण्यात येणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर बार्शी तालुका पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. एकाच कारवाईत तब्बल १९,३०० किलो तांदूळ, गहू आणि उडीद डाळ जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत ३१ लाख १५ हजार ९८१ रुपये आहे. तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि तहसीलदार बार्शी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मौजे फपाळवाडी येथील रेल्वे स्टेशनसमोरील अरणगाव रस्त्यावरील मांगडे यांच्या शेतात असलेल्या पत्रा शेडमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य साठवून ट्रक आणि पिकअपमध्ये भरून विक्रीसाठी नेले जात आहे. महसूल प्रशासन, पुरवठा प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तेथे पोत्यांमध्ये भरलेला तांदूळ, गहू आणि उडीद डाळ वाहनांमध्ये भरत असताना आढळला. पंचनामा करून वाहनांसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस...

**पुण्यातील इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द; सहा आयुर्वेदिक औषधांत बुरशी, अळ्या आणि कीटक आढळले**

इमेज
**पुण्यातील इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द; सहा आयुर्वेदिक औषधांत बुरशी, अळ्या आणि कीटक आढळले**  *KDM NEWS प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील जेजुरी एमआयडीसी येथील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) आणि औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. शासकीय विश्लेषणात कंपनीच्या सहा आयुर्वेदिक औषधांचे नमुने ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ (एनएसक्यू) म्हणून घोषित करण्यात आले. यात सिंहनाद गुग्गुळमध्ये बुरशीची वाढ, गोळ्यांवर काळे डाग आणि मायक्रोबियल लिमिट टेस्ट अयशस्वी; पुनर्नवादी मंडूरमध्ये बुरशी आणि मायक्रोबियल लिमिट उल्लंघन; त्रिफळा गुग्गुळमध्ये मायक्रोबियल मर्यादा ओलांडली; कांचनार गुग्गुळमध्ये टोटल मायक्रोबियल काउंट तसेच यिस्ट व मौल्ड मर्यादेपेक्षा जास्त; हिंगवाष्टक चूर्णामध्ये टोटल अॅश जास्त असून अळ्या, कीटक व बाह्य अशुद्ध पदार्थ; तर त्रिफळा ...

**बार्शीत श्रावणमास प्रवचनमाला; जयवंत महाराज बोधले यांचे ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २’**

इमेज
**बार्शीत श्रावणमास प्रवचनमाला; जयवंत महाराज बोधले यांचे ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २’**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ६ ऑगस्ट : श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट व श्री सद्गुरु बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त विशेष प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ पासून दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ही प्रवचनमाला सुरू होणार आहे. यावर्षी ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांच्या अमृतवाणीतून “श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २” या विषयावर संपूर्ण श्रावण महिनाभर निरूपण होणार आहे. डॉ. जयवंत महाराज बोधले हे बार्शी तालुक्यातील धामणगांव येथील असून, श्री संत माणकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज आहेत. सन २००३ पासून श्री भगवंत मंदिरात श्रावणमास प्रवचनमालेत ते विविध आध्यात्मिक विषयांवर निरूपण करीत आहेत. यंदा ही प्रवचनमाला सलग २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यापूर्वी त्यांनी श्री संत नामदेव महाराज चरित्र, हरिपाठ, श्रीकृष्ण चरित्र, विष्णुसहस्रनाम, श्री संत माणकोजी महाराज चरित्र, चांगदेव पासष्टी, श्री संत तुकाराम महाराज चरित्र ...

**आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले उद्योगपती कुमार मंगलम बिर्लांचे कुटुंब; कन्या अनन्या बिर्ला स्वतः पोहोचल्या पूरग्रस्त भागात!**

इमेज
**आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले उद्योगपती कुमार मंगलम बिर्लांचे कुटुंब; कन्या अनन्या बिर्ला स्वतः पोहोचल्या पूरग्रस्त भागात!**  KDM NEWS प्रतिनिधी आसाममधील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबे विस्थापित झाली असताना उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या अनन्या बिर्ला स्वतः पूरग्रस्त भागात पोहोचल्या आहेत. त्यांनी अनन्या बिर्ला फाउंडेशनच्या स्वयंसेवकांसह वरच्या आसाममधील जोरहाट आणि इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अन्नधान्य, स्वच्छता सामग्री, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. जुलैअखेरीस त्यांनी मुंबई, बंगळूरू आणि कोलकाता येथे मदत सामग्री गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात तांदूळ, डाळ, तेल, साबण, ओआरएस, मच्छरदाणी, स्वच्छता किट आणि शैक्षणिक साहित्य यांचा समावेश होता. गोळा झालेली मदत त्या स्वतः आसाममध्ये पोहोचवून गरजूंपर्यंत पोहोचवत आहेत. पूरग्रस्त कुटुंबांशी भेट घेताना आणि त्यांच्या अडचणी ऐकतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. अनन्या यांनी म्हटले आहे की, आसामच्या लोकांची लढाऊ वृत्ती प्रेरणादायी आहे आणि देणगीदारांच्या मदतीमुळे गरजूंना थेट...