पोस्ट्स

**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा**

इमेज
**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी **सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेसात ते सात चाळीस वाजता शेळगाव (आर) ता. बार्शी गावाच्या पुढे वैराग-सोलापूर रोडवर एका भीषण मोटरसायकल अपघातात ४५ वर्षीय शेखनुर दगडू शेख (रा. गणेश नगर बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या मोटरसायकलला सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. मृताच्या मुलाने १० ऑगस्ट रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलीसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी साहिल शेखनुर शेख (वय १९, शिक्षण  यांनी दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांचे वडील २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मोटरसायकल (एमएच १३ डीएफ १३५४) वरून बाळे येथून धामणगाव ता. बार्शी येथील आत्याकडे गेले होते. रात्री आठ वाजता आत्याचा मुलगा शौकत महुलाला शेख यांनी फोन करून सांगितले की, धामणगावहून सोलापूरकडे येताना रात्री साडेसात वाजता शेळगाव (आर) गावाच्या पुढे एका मोटरस...

**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा**

इमेज
**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा**  KDM NEWS प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान एक दुःखद घटना घडली. ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना काही ग्रामस्थांकडून शिवीगाळ, हुल्लडबाजी आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्यानंतर तीव्र मानसिक तणाव आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना काही तरुण आक्रमक झाले. त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक पाटील यांना टार्गेट करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाटील अस्वस्थ झाले. त्यांनी सभा अर्धवट सोडून स्वतःच्या दुचाकीने पारोळा सिव्हिल रुग्णालयाकडे प्रस्थान केले. मात्र काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या पाठलागाने त्यांचा तणाव आणखी वाढला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि प्राण गमावला. मृत्यूची बातमी पसरताच परिसरातील ग्रामसेवक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन क...

**बार्शीत महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी**

इमेज
**बार्शीत महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी**  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १८ : बार्शी शहरातील महिला, मुली, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे. त्यांनी शहर पोलीस ठाणे, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींचा पाठलाग, छेडछाड, अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे प्रकार, मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रसंग, महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी, घरफोडी, बाजारपेठेत मोबाईल व दुकान चोरी तसेच मोटारसायकल चोरी यांसारख्या घटना वाढत आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट, बिगर नंबर प्लेटची वाहने, मुलींच्या दिशेने वाहनांची रेस आणि हुल्लडबाजी याबाबतही तक्रारी येत आहेत. सायंकाळी चौक-बाजारपेठा व रहिवासी भागात तरुणांची टोळकी जमणे, मोटारसायकली आडव्या लावणे, वाढद...

**मुख्यमंत्री_फडणवीसांची_दिल्लीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण बैठक; पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सहकार्य मागितले**

इमेज
**मुख्यमंत्री_फडणवीसांची_दिल्लीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण बैठक; पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सहकार्य मागितले**  KDM_NEWS_प्रतिनिधी_नवी_दिल्ली, १७ ऑगस्ट : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशीही स्वतंत्र चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती आणि केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाकांक्षी कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील अनेक प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सादर केले. पुणे मेट्रो-३ प्रकल्पाबाबत विश...

**ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात संताप; जालन्यात गुन्हा दाखल, माफी मागितली**

इमेज
**ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात संताप; जालन्यात गुन्हा दाखल, माफी मागितली**  KDM NEWS प्रतिनिधी जालना / मुंबई : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील तरुणींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठा संताप निर्माण झाला आहे. यूट्यूब मुलाखतीत त्यांनी ओबीसी मंत्र्यांच्या कुटुंबातील विवाहाचा संदर्भ देत म्हटले की, “ओबीसी मंत्र्यांची गोंडस आणि सुंदर मुले तसेच पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात.” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत त्यांनी असेही म्हटले की, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठा मुली आल्या असल्याने मंत्री ओबीसी हिताकडे दुर्लक्ष करत आहेत. या वक्तव्यानंतर मराठा समाजातील महिला आणि विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. राज्यातील अनेक ठिकाणी, विशेषतः नांदेड आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यांत निदर्शने झाली. महिलांनी वाघमारे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. शिवसेना नेत्या रेखा कोंडे यांनी याला सर्व महिलांच्या सन्मानाचा विषय ठरवत माफीची मागणी केली. जालना येथील कदीम पोल...

**बार्शीतील नाकाबंदीत सराईत आरोपी गळाला; गावठी पिस्तूल, तलवार आणि ५ लाखांची कार जप्त, दोन जण फरार**

इमेज
**बार्शीतील नाकाबंदीत सराईत आरोपी गळाला; गावठी पिस्तूल, तलवार आणि ५ लाखांची कार जप्त, दोन जण फरार**  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आदेशानुसार बार्शी शहर पोलिसांनी रात्री ते पहाटे सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान अवैध शस्त्रांविरुद्ध धडक कारवाई केली. हिरामठ हॉस्पिटल (सुभाषनगर) परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकताना एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. दिनांक ११ ऑगस्ट रात्री ते १२ ऑगस्ट पहाटेदरम्यान बार्शी शहरात कॉम्बिंग व नाकाबंदी सुरू होती. बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सुभाषनगर येथील हिरामठ हॉस्पिटल परिसरात एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून स्विफ्ट डिझायर कारमध्ये बसला आहे आणि त्याच्यासोबत दोन इतर इसम आहेत. पोलिसांनी दोन पंचांसह त्वरित छापा टाकला. वाहन पाहताच दोन इसम अंधारात पळून गेले. मात्र, एकाला ताब्यात घेण्यात यश आले. अटक आरोपी : सचिन कुमार मिरगणे (वय ३८, रा. सुभाषनगर, बार्शी)...

**सत्संगरूपी सूर्योदयाने अज्ञानरात्रीचा अस्त : बार्शीत जयवंत महाराज बोधले यांचे श्रीमद्भागवत निरूपण**

इमेज
**सत्संगरूपी सूर्योदयाने अज्ञानरात्रीचा अस्त : बार्शीत जयवंत महाराज बोधले यांचे श्रीमद्भागवत निरूपण**  #KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ ऑगस्ट : बार्शीतील श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेत प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी ‘श्रीमद्भागवत’ या विषयावर निरूपण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सत्संगरूपी सूर्याचा उदय झाला की अज्ञानरूपी रात्रीचा अस्त होतो. २२ वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्रवचनमालेत बोधले महाराजांनी भागवतातील विविध प्रसंगांच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि भक्ताचे परमात्म्याशी असलेले नाते स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राजा परीक्षिताने शुकमुनींना सृष्टीच्या रचनेचे रहस्य विचारले होते. तसेच उद्धव आणि मैत्रेय यांच्यातील तत्त्वज्ञानाच्या चर्चेचे मर्म जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. उद्धव आणि विदुर यांची भेट व त्यांच्यातील संवाद हा ज्ञानाचा मोठा खजिना आहे. हे दोघेही श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. श्रीकृष्ण साक्षात भगवंत परमात्मा असून ज्ञान, लक्ष्मी, ऐश्वर्य, वैराग्य, औदार्य आणि यश हे सद्गुण त्यांच्यात एकवटलेले ...