**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त**
**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त** KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ, १६ ऑगस्ट २०२६ : पुणे-सोलापूर रस्त्यावर मोहोळ सीमा परिसरात कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून मोहोळ पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअपसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पिकअपमध्ये तीन मोठ्या देशी गाई आणि एक पाच दिवसांचे वासरू चारा-पाण्याची सोय न करता दाटीवाटीने भरलेले आढळले. गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सेवक आकाश निवृत्ती धर्मे (२९, रा. फुरसुंगी, पांडव दंड लेन क्र. १, पुणे) यांनी रविवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता खाजगी कामासाठी पुणेहून सोलापूरकडे येत असताना ही घटना नजरेस आली. त्यांनी पिकअप (क्रमांक केए ३२ डी १८७२) थांबवून तपासणी केली असता चालकाने फक्त दोन जनावरांचे खरेदी पावत्या दाखवल्या. इतर जनावरांची वैद्यकीय तपासणीही झालेली नव्हती. यामुळे जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री झाल्यानंतर धर्मे यांनी तिघांना पिकअपसह मोहोळ पोलीस ठाण्यास आणले. आरोपींची नावे : लक्ष्मण पिरप्पा होसमनी (२९, रा. सुदर्शन अपार्टमेंट, सर्वे क्र. १४/१अ/१३/१३१४...