*गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जांना ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा*
*गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जांना ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, दि. ७ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. सन २०२५ पासून गणेशोत्सव ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा होत आहे. या अंतर्गत ही वार्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीपासून देशभरातील व देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त मंडळांना सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळतील. पारितोषिक रचना अशी आहे – तालुका स्तर : प्रथम ...