*प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश व्हावा; मतदार यादी शुद्धीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*
*प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश व्हावा; मतदार यादी शुद्धीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले* KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये सुरू केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे शुद्धीकरण सुरू आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश करणे आणि अपात्र नागरिकांना वगळणे हा याचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, नोडल अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्रीमती तेली-उगले म्हणाल्या...