*बार्शी: गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; ३१ गुन्हेगारांना शहरबंदी!*
*बार्शी: गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; ३१ गुन्हेगारांना शहरबंदी!* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सार्वजनिक शांततेला बाधा येऊ नये, यासाठी बार्शी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ३१ व्यक्तींना बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशानुसार झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी प्रस्ताव सादर केला. त्यावर उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्र. १ सदाशिव पडघुणे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३(३) अन्वये विशेष आदेश पारित केले. या आदेशानुसार संबंधित व्यक्तींना गणेशोत्सवाच्या संवेदनशील काळात शहरात प्रवेश करता येणार नाही. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी स्पष्ट केले की, उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प...