पोस्ट्स

**बारामती ॲग्रोच्या पाणी वापरावरून राजकीय वाद तापला; रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना जोरदार टोला**

इमेज
*बारामती ॲग्रोच्या पाणी वापरावरून राजकीय वाद तापला; रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना जोरदार टोला*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : उजनी धरणातील पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला राजकीय वाद आता थेट बारामती ॲग्रोपर्यंत पोहोचला आहे. भाजपचे बार्शी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची झोड उठली आहे. राजेंद्र राऊत यांनी बारामती ॲग्रोला लक्ष्य करत म्हटले की, कारखान्याला उजनी धरण आणि नीरा नदीतून वर्षभरात सुमारे २५ हजार कोटी लिटर पाणी मिळते. दुष्काळी परिस्थितीत मद्यनिर्मितीसाठी पाणी वापरू नये. ते पाणी शेती आणि पिण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे. तसे न केल्यास बारामती ॲग्रोसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. “आधी स्वतःच्या कारखान्यातले दारूचे उत्पादन बंद करा आणि मग बोल,” असेही राऊत म्हणाले. त्यांनी रोहित पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप करत “आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून” अशी टीका केली. या टीकेला आज रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. “कारखाने आणि डिस्टिलरी कशा चालत...

*बार्शी : कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी वाढदिवस रद्द करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत*

इमेज
*बार्शी : कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी वाढदिवस रद्द करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाला लक्षात घेऊन भारतीय सेनेत कार्यरत कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी आपला वाढदिवस सोहळा रद्द केला. वाढदिवसावर होणारा खर्च दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात आला. डोराळे येथील उर्मिला चंद्रकांत धायगुडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आणि संतोष सुरेश शिंदे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत स्वरूपात मदत देण्यात आली. यावेळी कॅप्टन बाळासाहेब डमरे यांच्यासह माजी नगरसेवक दिलीपकुमार डमरे, आदर्श उद्योग समूहाचे रविंद्र अण्णासाहेब राऊत, प्रसाद डमरे, दारोले गावचे सरपंच अमोल शिंदे, शेखर जगताप, सोनू शिंदे, समाधान देशमुख, राहुल खरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल शिंदे, सरपंच दत्ता चोरमले, दूध डेअरी चेअरमन नंदू शिंदे, नितीन जाधव, अमोल राजगुरू, शरद शिंदे, बाबासाहेब रड्डी व इतर सहकारी उपस्थित होते. कॅप्टन डमरे यांनी देशसेवा करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून ...

*चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा; औषधे-लसींचा तातडीचा पुरवठा करण्याची मागणी*

इमेज
*चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा; औषधे-लसींचा तातडीचा पुरवठा करण्याची मागणी*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ४ नोव्हेंबर : चिखर्डे येथील आयुष्मान आरोग्य मंदिर-प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षा तसेच पांगरी जिल्हा परिषद गट सदस्य व सोलापूर जिल्हा परिषद अर्थ समिती सदस्य डॉ. सौ. रेश्मा देवेंद्र डोके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेत केंद्रातील विविध समस्या, इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गाच्या गरजेबाबत सविस्तर चर्चा झाली. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र रामलिंग डोके यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुपडवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे, लसी, इंजेक्शन आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुपडवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सम...

*मोठी बातमी: पार्थ आणि जय पवारांमध्ये वादाची ठिणगी, रोहित पवारांचा थेट आरोप*

इमेज
**मोठी बातमी: पार्थ आणि जय पवारांमध्ये वादाची ठिणगी, रोहित पवारांचा थेट आरोप*  KDM NEWS प्रतिनिधी मुंबई/पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खळबळीचा मुद्दा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट आरोप केला आहे की, भाजप आणि अजित पवार गटातील काही नेते खासदार पार्थ पवार आणि जय पवार या दोन भावांमध्ये राजकीय मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने काका-पुतण्यांमध्ये (शरद पवार आणि अजित पवार) वाद लावून दोघांना वेगळे केले, त्याच पद्धतीने आता दोन भावांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. पार्थ आणि जयमध्ये राजकीय दृष्टिकोनातून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.” सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही चर्चा जोरात सुरू झाली. अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेते पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने नाराज असल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याचवेळी जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिल्य...

*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद*

इमेज
*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद*  KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा राजकीय उलथापालथ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक, सुरेश हसापुरे यांच्यासह सुमारे १० माजी संचालकांचे अर्ज नामंजूर केले. २०२४ मध्ये बेकायदेशीर कर्जवाटप आणि बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी झालेल्या कारवाई तसेच सहकार कायद्यातील कलम ११०अ अंतर्गत दोन टर्म अपात्रतेच्या तरतुदींनुसार हा निर्णय देण्यात आला. एकूण २०१ उमेदवारांनी २३८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ अर्ज बाद तर ३० दुबार ठरले. वैध अर्जांची संख्या १६७ आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे अर्ज मात्र मंजूर झाल्याने मोहिते-पाटील कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख या...

*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद*

*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद* KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा राजकीय उलथापालथ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक, सुरेश हसापुरे यांच्यासह सुमारे १० माजी संचालकांचे अर्ज नामंजूर केले. २०२४ मध्ये बेकायदेशीर कर्जवाटप आणि बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी झालेल्या कारवाई तसेच सहकार कायद्यातील कलम ११०अ अंतर्गत दोन टर्म अपात्रतेच्या तरतुदींनुसार हा निर्णय देण्यात आला. एकूण २०१ उमेदवारांनी २३८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ अर्ज बाद तर ३० दुबार ठरले. वैध अर्जांची संख्या १६७ आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे अर्ज मात्र मंजूर झाल्याने मोहिते-पाटील कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह काही प्रम...

*बार्शी : कव्हे गावातील रस्ता वादात तहसीलदारांचा तडजोड आदेश; १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर*

इमेज
*बार्शी : कव्हे गावातील रस्ता वादात तहसीलदारांचा तडजोड आदेश; १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : मौजे कव्हे तालुका बार्शी येथील शेतजमिनीत जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबतच्या दीर्घकाळ चाललेल्या दाव्यात तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दोन्ही पक्षांच्या तडजोडीला मान्यता देत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या आदेशानुसार गट नंबर ८९ व ९० च्या बांधावरून नैसर्गिक पाण्याची वाट आणि १२ फुटी बैलगाडी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. संतोष शिवाजी माने, मारुती शंकर माने, लहू श्रीपती माने, शहाजी प्रताप माने, भिमराव भागवत माने, संभाजी चंद्रहार माने, समाधान गुलाबराव माने, राजाराम विभिषण माने, धनाजी चंद्रहार माने, विलास गजेंद्र माने, महादेव नागनाथ माने, भास्कर वसंतराव माने आणि राहुल दिनकर माने या अर्जदारांनी अरुण तुकाराम माने यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. अर्जदारांचा दावा होता की, त्यांच्या गट नंबर ८३, ८४, ८५ व इतर शेतजमिनीत जाण्यासाठी गट नंबर ८९ च्या बांधावरून पूर्वापार रस्ता आहे. मात्र सामनेवाल्याने ३० मे २०२४ रोजी रस्ता नांगरून अडथळा न...