पोस्ट्स

**पंढरपूर : वृद्ध प्रेमप्रकरणातून हत्या, दीड महिन्यानंतर डीएनए अहवालाने उघडला खून**

इमेज
*पंढरपूर : वृद्ध प्रेमप्रकरणातून हत्या, दीड महिन्यानंतर डीएनए अहवालाने उघडला खून*  *KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर*सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ७० वर्षीय अंबादास खांडेकर यांची त्यांच्या प्रेयसी मंगल होनमाने (७०) यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. मंगलला पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्हा कबूल केला आहे. अंबादास आणि मंगल यांच्यातील प्रेमसंबंध गेल्या काही वर्षांपासून चालू होते. दोघे गावात नियमित भेटत असत. २७ जुलै रोजी दोघांमध्ये किरकोळ वादातून जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात मंगलने अंबादासवर हल्ला करून शेतातच त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळून टाकला आणि पळून गेली. २ ऑगस्ट रोजी गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. पोलिसांना माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली. मृतदेह पूर्ण जळाल्याने ओळख पटणे अवघड होते. नमुन्यांची डीएनए तपासणी करण्यात आली. दीड महिन्यानंतर अंबादास यांच्या दोन मुलींच्या डीएनए अहवालातून मृतदेह त्यांचा असल्याची पुष्टी झाली. ओ...

*बार्शीत लंबोदर प्रतिष्ठानचा महिला आरती व खेळसोहळा उत्साहात; सुप्रिया पवार ठरल्या 'सोन्याची नथ'च्या मानकरी

इमेज
*बार्शीत लंबोदर प्रतिष्ठानचा महिला आरती व खेळसोहळा उत्साहात; सुप्रिया पवार ठरल्या 'सोन्याची नथ'च्या मानकरी*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :   शिवछत्रपती व्यायाम शाळा, पाटील चाळ तरुण गणेश मंडळ संचलित लंबोदर प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित महिला आरती व मनोरंजक खेळ सोहळा तुळजापूर रोड, पाटील चाळ येथील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या उपस्थितीत भावपूर्ण महाआरतीने झाली. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला. लहान मुला-मुलींनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थितांनी बालकलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संज्योती योगेश थोरात यांनी खुसखुशीत आणि ओघवत्या शैलीत केले. त्यामुळे वातावरण उत्साहात राहिले. मनोरंजक खेळ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक सुप्रिया संघर्ष पवार यांनी पटकावला. त्यांना सोन्याची नथ प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांक नीता महेश स...

*महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट*

इमेज
*महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट*  *KDM NEWS प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवार, २१ सप्टेंबर रोजी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाचे वादळी वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. **कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?**   यलो अलर्ट खालील जिल्ह्यांसाठी आहे: ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक (घाट भाग), अहिल्यानगर, पुणे (घाट भागासह), कोल्हापूर (घाट भागासह), सातारा (घाट भागासह), सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ. काही अंदाजानुसार अमरावती, भंडारा आणि बुलढाणा यांचाही समावेश आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागांत आज व उद्या वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात २३ सप्टेंबरनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आह...

*बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी चर्चच्या निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची बिनविरोध निवड!*

इमेज
*बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी: २०२६ च्या निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची एकमुखाने बिनविरोध निवड*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी | बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी चर्च (सीएनआय पुणे धर्मप्रांत) येथे २०२६ च्या चर्च निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची बिनविरोध निवड झाली. मंडळीच्या सेवेसाठी, आध्यात्मिक वाढीसाठी, एकतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व सेवकांनी संकल्प व्यक्त केला. अध्यक्षपदी प्रीस्ट इन्चार्ज रेव्ह. अभिजीत तुपसुंदरे पाळकसाहेब, उपाध्यक्षपदी मि. शमुवेल अशोक नवगिरे, सेक्रेटरीपदी मि. राकेश प्रेमचंद नवगिरे आणि खजिनदारपदी मि. राजू शशिकांत लोखंडे यांची निवड झाली. ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलमध्ये शमुवेल अशोक नवगिरे, आधार सुधाकर दाखले, अविनाश तीमथी चांदणे, राजू शशिकांत लोखंडे, डेव्हिड ताराचंद रणदिवे, रविकांत सूर्यकांत लोखंडे, राकेश प्रेमचंद नवगिरे, प्रशांत प्रमोद चांदणे, सागर वसंत गवळी, रोहित लूथर चांदणे आणि सागर विशाल साने यांचा समावेश आहे. निवडीनंतर मंडळीच्या सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सेवकांचे अभिनंदन केले. ही निवड केवळ पदाची जबाबदारी नसून प्रभू येशू ख्रिस्त...

*एसटीच्या NCMC कार्डसाठी मोठे बदल; अमृत ज्येष्ठांना आधार OTPची सुविधा*

इमेज
*एसटीच्या NCMC कार्डसाठी मोठे बदल; अमृत ज्येष्ठांना आधार OTPची सुविधा*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १८ सप्टेंबर :** महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांसाठी नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. ज्या अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिकमध्ये जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या OTPद्वारे नोंदणी करता येणार आहे. यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. २१ सप्टेंबरपासून हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नवीन कार्ड मिळवता येईल. १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्यांना QR कोड असलेली पावती दिली जात आहे. ही पावती ETIM मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट मिळेल आणि ती ३० दिवस व...

*बार्शी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी विशेष शिबिरे*

इमेज
*बार्शी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी विशेष शिबिरे*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर, १८ सप्टेंबर २०२६   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २४६ बार्शी विधानसभा मतदारसंघात दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आला आहे.   या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, विद्यमान नोंदीत दुरुस्ती आणि नाव वगळणीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.            मुख्य बाबी :  - ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत गैरहजर, स्थलांतरित किंवा इतर कारणांमुळे नाव समाविष्ट न झालेल्या मतदारांना सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून नाव अंतर्भूत करण्याची संधी उपलब्ध आहे.   - ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षण झाले नसल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नाव नोंदविता आले नव्हते. आता १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे प...

*बार्शीत महालक्ष्मी सणानिमित्त ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी ज्ञानमय आरास; मांजरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!*

इमेज
*बार्शीत महालक्ष्मी सणानिमित्त ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी ज्ञानमय आरास; मांजरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** महालक्ष्मी सणानिमित्त धर्माधिकारी प्लॉट येथील मांजरे परिवाराच्या निवासस्थानी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राची अनोखी आरास साकारण्यात आली आहे. ही ज्ञानमय सजावट बार्शीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे गेल्या २५ वर्षांपासून नियमित विद्यार्थी असलेले ब्रह्माकुमार विलासभाई मांजरे (सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक) व जयश्री मांजरे यांच्या घरी ही आरास केली आहे. त्यांची स्नुषा सुजाता राहुल मांजरे यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ती साकारली. आरासीत सेवाकेंद्रातील दैनंदिन आध्यात्मिक वातावरण दाखवले आहे. राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी दीदी मुरली वाचन करीत असून गृहस्थ दांपत्ये, मातृशक्ती, बंधू, कुमार-कुमारी श्रवणासाठी उपस्थित असल्याचे दृश्य मूर्तीरूपात साकारले आहे. दीदींच्या हातातील ज्ञानमुरली विशेष आकर्षण आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र, माऊंट आबू येथील ब्रह्माबाबांची ऐतिहासि...

*बार्शी ग्रामीण भागात अघोषित वीजखंड; कासारवाडी सबस्टेशनच्या अनियमित कारभाराने नागरिक हैराण*

इमेज
*बार्शी ग्रामीण भागात अघोषित वीजखंड; कासारवाडी सबस्टेशनच्या अनियमित कारभाराने नागरिक हैराण*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषित भारनियमनामुळे विजेचा लपंडाव वाढला आहे. कासारवाडी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज कधी बंद होईल आणि कधी येईल, याचा ठराविक वेळापत्रक नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर येथील महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून भारनियमन आदेश आले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याबाबत स्थानिक पातळीवर कोणतीही पूर्वसूचना किंवा निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. परिणामी घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि जोडधंदे प्रभावित होत आहेत. परिसरात वीज चोरीची चर्चा असतानाही त्यावर ठोस कारवाई दिसत नाही. वेळेवर बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लक्ष घालून निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची आणि वीज चोरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. KDM NEWS प्रतिनिधी 

*जरांगेंनी उपोषण स्थगित केले; सरकारला ९० दिवसांचा अल्टीमेटम*

इमेज
*जरांगेंनी उपोषण स्थगित केले; सरकारला ९० दिवसांचा अल्टीमेटम*  *KDM NEWS प्रतिनिधी पाटोदा (बीड) :* मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे २० दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केले. सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शिष्टमंडळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादाजी भुसे, आमदार सुरेश धस आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. बीडचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सकाळी पाच वाजता शिष्टमंडळ पाटोदा येथे दाखल झाले. सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी थेट कॅमेऱ्यासमोरच बोलणी सुरू होती. जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले होते. प्रकृती खालावल्याने ते पाटोदा येथे थांबले होते. उपोषणाचा २०वा दिवस सुरू असताना शिष्टमंडळाने त्यांना मराठा आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध गॅझेट तीन महिन्यांत शासन निर्णय काढून लागू करण्याचे, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे आणि शिंदे समितीने शोध...

*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर*

इमेज
*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर*  *KDM NEWS प्रतिनिधी पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संतोष गजानन पंडित  नारायण पेठ यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी जामीन अर्ज क्रमांक ४८८८/२०२६ मंजूर केला. पंडित यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर व तितक्याच रकमेच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. **न्यायालयाच्या अटी**   फिर्यादीशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये. अभियोजन पुराव्यात हस्तक्षेप करू नये. **प्रकरणाची पार्श्वभूमी**   सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंडित यांनी युट्युब व सोशल मीडियावर अपलोड केलेल्या रील्स-व्हिडिओंमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, एक महिला पुणे महानगरपालिक...

*बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल*

इमेज
*बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल* *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १६ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे दोन वाजता खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या छोट्या मंदिराजवळ घडली. उपळाई ठोंगे येथील अनिल मधुकर ढेरे (३६) यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) चालवत असताना पाठीमागे सुनिल पाडुरंग जाधव (३०, रा. उपळाई ठोंगे) बसले होते. दोघे खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता हायस्पीडने, अविचाराने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही पडले. अपघातात पाठीमागे बसलेल्या सुनिल जाधव यांच्या पोटास गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.१६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मोटारस...

*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता*

इमेज
*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता* KDM NEWS प्रतिनिधी दिल्ली/मुंबई : नैऋत्य मान्सूनची माघार शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पश्चिम राजस्थानातून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असली तरी यंदा दोन दिवस उशिरा माघार सुरू होईल. देशभरात १ जून ते १४ सप्टेंबर दरम्यान १५ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रात ही तूट १६ टक्के आहे. मराठवाड्यात ३६ टक्के तर विदर्भात २७ टक्के तूट नोंदवली गेली आहे. बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ४० टक्क्यांहून अधिक तूट आहे. २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांहून अधिक पावसाचा खंड पडला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनची माघार २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. माघार सुरू झाली तरी काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. पुढील काही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होईल. एल निनोचा प्रभाव आणि असमान पावसामुळे खरीप हंगाम धोक्य...

**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल** सोलापूर, १६ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रथम खबर नोंदणी क्रमांक ३०६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या छोट्या मंदिराजवळ घडली. उपळाई ठोंगे येथील अनिल मधुकर ढेरे (वय ३६) यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) चालवत असताना पाठीमागे सुनिल पाडुरंग जाधव (वय ३०, रा. उपळाई ठोंगे) बसले होते. दोघे खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता हायस्पीड, अविचाराने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही पडले. अपघातात पाठीमागे बसलेल्या सुनिल जाधव यांच्या पोटास गंभीर इजा झाली. त्...

*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये मनाई आदेश; ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी*

इमेज
*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये मनाई आदेश; ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर*सोलापूर, १६ सप्टेंबर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश आज रात्री ८ वाजतांपासून ३० सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहील. अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून अधिक लोकांचे एकत्र येणे, सभा, मिरवणूक यांना बंदी आहे. तसेच शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, झेंडा लावलेली काठी किंवा शरीराला इजा पोहोचवू शकणारी कोणतीही वस्तू बाळगणे, ज्वालाग्राही वा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकण्याची उपकरणे बाळगणे यांनाही मनाई आहे. व्यक्ती, प्रेतयात्रा किंवा प्रतिमांचे प्रदर्शन, सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा वापरणे, जाती-जमातींच्या भावना दुखावणारे कृत्य, सोंगे किंवा चिन्हे तयार करून प्रसार करणे यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्य...

*₹११ ची वस्तू रुग्णालयात ₹३२५ ला; ₹६.७५ ची सिरिंज MRP ₹५७.२० – एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांतील महागडी लूट*

इमेज
*₹११ ची वस्तू रुग्णालयात ₹३२५ ला; ₹६.७५ ची सिरिंज MRP ₹५७.२० – एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांतील महागडी लूट*  *KDM NEWS प्रतिनिधी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणे आणि कॉन्झ्युमेबल्सच्या किमतींतील प्रचंड फरक उघडकीस आणला आहे. राज्यातील सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकड्यांनुसार रुग्णालयांना मिळणारी खरेदी किंमत (ट्रेड प्राइस) आणि रुग्णांकडून वसूल होणारी छापलेली एमआरपी यात हजारो टक्के नफा दिसून येत आहे. *सर्वेक्षणात समोर आलेले धक्कादायक आकडे - आयव्ही इन्फ्यूजन सेट (सलाईन नळी) : रुग्णालयाला मिळणारी किंमत ₹११.०५; छापलेली एमआरपी ₹३२५. यात जवळपास *२,८४१ टक्के** नफा. - सिरिंज : खरेदी किंमत ₹६.७५; एमआरपी ₹५७.२०. - कॅथेटर : खरेदी किंमत ₹२९.४१; एमआरपी ₹३१०. याशिवाय नेब्युलायझर आणि ऑक्सिजन मास्कसारख्या इतर वस्तूंमध्येही १३०० ते १६०० टक्क्यांपर्यंत मार्जिन आढळले आहे.   मुंढे काय म्हणाले? तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, रुग्णालयातील बिलाचा सर्वात महागडा भाग कधीकधी रुग्णालयाशी थेट...

*बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; चारा छावण्या व तातडीची मदत सुरू करा : शिवसेनेची मागणी*

इमेज
*बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; चारा छावण्या व तातडीची मदत सुरू करा : शिवसेनेची मागणी*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : बार्शी तालुक्यात जून ते सप्टेंबरमध्ये सुमारे ५० ते ६० दिवस सलग पावसाचा खंड पडल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख व बार्शी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी पांडुरंग (नाना) त्रिंबक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर झाले. त्यात म्हटले आहे की, जूनमध्ये अत्यल्प पाऊस झाला आणि त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाने दांडी मारल्याने खरिपाच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली; मात्र पाऊस नसल्याने सोयाबीन, ऊस, कांदा, फळबागा आणि इतर पिके पूर्णतः करपली आहेत. शेतीची कामे थांबली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पिण्याच्या पाण्या...

*मराठा आरक्षणाला वेग; शिंदे समिती आणि कक्षासाठी नवीन प्रशासन भवनात स्वतंत्र जागा जाहीर!*

इमेज
*मराठा आरक्षणाला वेग; शिंदे समिती आणि कक्षासाठी नवीन प्रशासन भवनात स्वतंत्र जागा जाहीर!*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १६ सप्टेंबर २०२६ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा प्रशासकीय शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाच्या कामकाजासाठी नवीन प्रशासन भवनात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. *नेमका आदेश काय? नवीन प्रशासन भवनाच्या १२व्या मजल्यावरील पश्चिम बाजूची ऊर्जा विभागाला वाटप केलेली जागा आता शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाला देण्यात येणार आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ ९६४.४४ चौरस फूट असून प्रत्यक्ष उपलब्ध क्षेत्रफळ ७७५ चौरस फूट आहे. त्याच मजल्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या रोखशाखेला वाटप झालेली पण अद्याप ताब्यात न घेतलेली ४०० चौरस फूट जागा ऊर्जा विभागाला देण्यात येईल. गृह विभागाच्या ताब्यातील १,१०३ चौरस फूट जागेपैकी ८४६ चौरस फूट गृह विभागाकडेच राहणार असून उर्वरित २५७ चौरस फूट ऊर्जा विभागाला देण्यात येणार आहे. समिती आणि कक्...

*बार्शी तालुक्यातील रस्तापूर येथे रात्री उशिरा राडा; जुन्या वादातून युवक आणि आईवर लोखंडी रॉड व साखळीने जीवघेणा हल्ला*

इमेज
*बार्शी तालुक्यातील रस्तापूर येथे रात्री उशिरा राडा; जुन्या वादातून युवक आणि आईवर लोखंडी रॉड व साखळीने जीवघेणा हल्ला*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १५ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रस्तापूर गावात रविवारी रात्री हनुमान मंदिर कट्ट्याजवळ एका युवक व त्याच्या आईवर लोखंडी रॉड, साखळी आणि काठीने हल्ला झाला. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी ऋषीकेश सुरेश मोहिते (वय २१, शेतकरी, रा. रस्तापूर) यांच्या म्हणण्यानुसार, ते मंदिर कट्ट्याजवळ उभे असताना ओंकार रामलिंग बरबडे काळ्या स्कॉर्पिओ गाडीत (क्रमांक एमएच २४ एएफ ३३३३) आले. गाडीतून ओंकार बरबडे, संदीप बिरमल मोहिते, किरण बिरमल मोहिते, परमेश्वर जयराम पालकर, सुरज हरिचंद्र देशमुख आणि विशाल बापुसाहेब बरबडे उतरले. त्यांनी फिर्यादीला गाडी काढण्याची मागणी केली. फिर्यादीने चावी नसल्याचे सांगितले असता आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवली. ओंकार बरबडे यांनी “तुला लई माज आला आहे” असे म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केला. घरातील लोक सोडविण्यास आले असता किरण मोहिते यांनी साखळीने डोक्यात मार...

*मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; प्रकृती अस्वस्थ असतानाही आंदोलनाचा निर्धार कायम!*

इमेज
*मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; प्रकृती अस्वस्थ असतानाही आंदोलनाचा निर्धार कायम!*  KDM_NEWS_प्रतिनिधी वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले. उपोषणाच्या १८ व्या दिवशीही त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना त्यांनी मुंबईत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी रणनीती बदलली. केवळ दहा सहकारी आणि दोन रुग्णवाहिकांसह ते निघाले. समाजाने सध्या मुंबईत येऊ नये, योग्य वेळी हाक देईन, असे आवाहन त्यांनी केले. एकजूट कायम ठेवा, शांततेने आंदोलन करा आणि संयम सोडू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी मराठा समाजाकडे केले. अंतरवाली सराटीतून निघताना औक्षण झाले. गाडीत बसताच जरांगे पाटील भावूक झाले. अवघ्या एक किलोमीटरचे अंतर पार करायला हजारो समर्थक आणि वाहनांच्या रांगेमुळे एक तास लागला. वडीगोद्रीतही मोठी गर्दी जमली होती. परिसरात आंदोलनाचे वातावरण होते. या दौऱ्यासाठी ६४८ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैन...

*सोलर प्लांट व नदीकाठच्या कॉपर वायर चोरीचे ६ गुन्हे उकल; १४५ किलो वायरसह आरोपी जेरबंद*

इमेज
*सोलर प्लांट व नदीकाठच्या कॉपर वायर चोरीचे ६ गुन्हे उकल; १४५ किलो वायरसह आरोपी जेरबंद*  KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १४ सप्टेंबर २०२६   स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने सोलर प्लांट व नदीकाठच्या इलेक्ट्रिक मोटारींतील कॉपर वायर चोरीचे एकूण सहा गुन्हे उकलले असून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून १४५ किलोग्रॅम वजनाचे कॉपर वायर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १ लाख ८८ हजार ५०० रुपये आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकास या चोऱ्यांचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. पथकाला मौजे रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले) हा त्याच्या साथीदारासह गौडगाव (ता. बार्शी) येथील सोलर प्लांट तसेच उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी (ता. माढा) येथील ठिकाणांहून कॉपर वायर चोरून आणत आहे आणि सध्या गावातील घराजवळ विक्रीसाठी उभा आहे. बातमीनुसार पोलीस पथक रानमसले येथे पोहोचले. आरोपी...