**आरटीई २५% जागांवरील विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी १०६.२६ कोटींचा निधी मंजूर**
*आरटीई २५% जागांवरील विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी १०६.२६ कोटींचा निधी मंजूर* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २३ सप्टेंबर २०२६ : शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय क्रमांक आरटीई-२०२६/प्र.क्र.१३३ (ई-१६२६३६१)/एडी-१ नुसार रुपये १०६,२६,८३,६२६ (एकशे सहा कोटी, सव्वीस लाख, त्र्याऐंशी हजार सहाशे सव्वीस) इतका निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे. **मुख्य मुद्दे :** - हा निधी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदीतून उपलब्ध करण्यात आला आहे. - उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी दिलेल्या आदेशांनुसार प्रलंबित शुल्क प्रतिपूर्तीसाठी काही शाळांनी दाखल केलेल्या याचिकांच्या अनुषंगाने हा निधी वितरित करण्यात येत आहे. - काही विशिष्ट शाळांसाठी अतिरिक्त रुपये ११.९० कोटींचा निधीही उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अनुपालनासाठी मं...