*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका*
*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका* KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑक्टोबर : बार्शी बायपास रोडवरील नागोबाचीवाडी शिवारातील डिलक्स स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी रात्री ११.१० वाजता छापा टाकला. या कारवाईत स्पाचा कुंटणखाना म्हणून वापर करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींची नावे अशी आहेत – बाबाभाई खाजाबाई चौधरी , सुरत, गुजरात जो डिलक्स स्पाचा मॅनेजर आहे आणि आकाश काशीद (रा. बार्शी), जो स्पाचा मालक आहे. फिर्यादी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोहेकॉ / ८३२ सूर्यकांत ठाकरू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी संगनमत करून स्पा सेंटरचा कुंटणखाना म्हणून वापर केला. महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका चालवली. गुन्हा बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रत...