*गोकुळ अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू होताच सतेज पाटील गट आक्रमक; निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट मोठी मागणी*
**गोकुळ अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू होताच सतेज पाटील गट आक्रमक; निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट मोठी मागणी* KDM NEWS प्रतिनिधी कोल्हापूर, १० नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे थेट मोठी मागणी करत त्यांनी बहुमताच्या जनादेशाचा सन्मान करण्याची आग्रही मागणी केली आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते, तर महायुती समर्थित गटाला १२ जागा मिळाल्या. अध्यक्ष निवडीसाठी पोटनियमानुसार १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने महायुतीच्या १२ संचालकांनी पहिल्या बैठकीला गैरहजर राहिल्याने प्रक्रिया रखडली होती. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिरगाव येथील मुख्य कार्यालयात बैठक घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत मागणी केली की, निवडून आल...