*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त*
*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ३१ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याने सोमवारी पेट्रोलिंगदरम्यान माहिती मिळताच कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले. रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/१ सचिन अशोक नितनात, पोहेकॉ साठे आणि म कोतवाल यांच्या पथकाकडे बातमी मिळाली की सोलापूर रोडवरील ८ नंबर शाळेसमोर बंद टपरीजवळ एक इसम ये-जा करणाऱ्या लोकांकडून अंक आकड्यांवर पैज लावून मटका खेळवत आहे. पंचासह घटनास्थळी गेल्यावर दुपारी १.१५ वाजता संजय दत्तु भालशंकर (२९, बगले बरड, सोलापूर रोड, बार्शी) याला कागदावर आकडे मोडताना पकडले. त्याच्याकडून २५० रुपये रोख, पांढरा कागद (आकडेमोड) आणि निळ्या शाईचा बॉलपेन जप्त करण्यात आले. दुसऱ्या घटनेत पोकॉ/१८६० अजिज मनसुब शेख यांच्या पथकाकडे बस स्टँड परिसरातील माहिती मिळाली. दुपारी १२.२५ वाजता संदेश राजे मिल्क दुकानासमोर रविंद्र तानाजी ...