**पिसाळलेल्या लांडग्याचा शोध अद्याप सुरू; ग्रामस्थांना सावधगिरीचे आवाहन**
**पिसाळलेल्या लांडग्याचा शोध अद्याप सुरू; ग्रामस्थांना सावधगिरीचे आवाहन** **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (सोलापूर), १५ ऑक्टोबर : तालुक्यातील रातंजन परिसरात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी एका पिसाळलेल्या लांडग्याने ग्रामस्थांवर हल्ले करून दहशत पसरवली होती. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत परिसरात शोधमोहीम राबवली असून, अद्याप लांडग्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद प्राण्याशी संपर्क साधू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जनजागृती अभियान राबवले. वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी सांगितले की, पिसाळलेला लांडगा काही दिवसांत नैसर्गिकरीत्या मृत होऊ शकतो; मात्र, त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांसारख्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे असा लांडगा जिवंत किंवा मृत आढळल्यास हात न लावता तात्काळ वन विभागाला कळवावे. १५ ऑक्टोबर रोजी पुणे येथील रेस्क्यू टीमचे नचिकेत अवधानी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबवण्यात आली. यात वनरक्षक सचिन पुरी (वैराग), बालाजी धुमा...