पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*बार्शी बसस्थानकाचा कायापालट: १० कोटी ७७ लाखांच्या निविदेनंतर आधुनिक इमारतीचे स्वप्न अंतिम टप्प्यात*

इमेज
*बार्शी बसस्थानकाचा कायापालट: १० कोटी ७७ लाखांच्या निविदेनंतर आधुनिक इमारतीचे स्वप्न अंतिम टप्प्यात*  *KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)*: बार्शीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेले भव्य, सुसज्ज आणि आधुनिक बसस्थानक लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) च्या बार्शी आगाराची पुनर्बांधणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अंतरिम मंजुरीनंतर ३डी आर्किटेक्चरल आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाइन जाहीर करण्यात आले आहे. लवकरच वर्क ऑर्डर काढून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या आमदारकीत या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महायुती सरकारने प्रारंभी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नंतर डिसेंबर २०२५ मध्ये १० कोटी ७७ लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. या निविदांमुळे प्रकल्पाला ठोस गती मिळाली आहे. नव्या बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यात प्रशस्त प्रतीक्षागृह, सुबक तिकीट काऊंटर, स्वच्छतागृहे, महिला विश्रांतीगृह, ज्वेलरी लॉकर रूम, रिझर्वेशन आणि...

**बार्शी : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला विनयभंग; आईने दिला छुपा पाठिंबा, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा**

इमेज
**बार्शी : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला विनयभंग; आईने दिला छुपा पाठिंबा, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी* (सोलापूर) :  बार्शी शहरातील एका ११ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुलीच्या शेजारी राहणारा आरोपी आणि तिची स्वतःची आई यांच्यावर पोक्सो कायद्याखालील कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी इयत्ता पाचवीत शिकते. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास पीडितेचे वडील कामावर आणि भावंडे बाहेर असताना आरोपीने घरात घुसून मुलीला एकटी असल्याचे पाहताच तिला जबरदस्तीने मांडीवर बसवले आणि लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. मुलीने लगेच आईला ही बातमी सांगितली, पण आईने आरोपीला विरोध करण्याऐवजी “तो तुझा मामा आहे, काहीही होत नाही” असे म्हणत मुलीला गप्प बसवले. दुसऱ्या दिवशी आरोपीने आईसमोरच मुलीचा गाल पकडून अश्लील बोलणे केले, तरी आईने त्याकडे दुर्लक्ष केले. २३ फेब्रुवारीच्या रात्री मुलीने आई आणि आरोपीला संशयास्पद स्थितीत पाहिले. तेव्हा आर...

*बार्शी शहर पूर्णपणे भोंगेमुक्त ? पोलीसांची कठोर कारवाई: ८ मस्जिदींवरील १४ भोंगे, ५ मंदिरांवरील ८ भोंगे उतरवले*

इमेज
*बार्शी शहर पूर्णपणे भोंगेमुक्त ? पोलीसांची कठोर कारवाई: ८ मस्जिदींवरील १४ भोंगे, ५ मंदिरांवरील ८ भोंगे उतरवले*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २८ फेब्रुवारी २०२६ :** बार्शी शहर पोलीस ठाण्याने आज अनधिकृत भोंग्यांविरुद्ध मोहीम राबवत शहराला पूर्णपणे भोंगेमुक्त केले. यात ८ मस्जिदींवरील १४ भोंगे आणि ५ मंदिरांवरील ८ भोंगे काढण्यात आले. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या धार्मिक स्थळांवरील आवाज नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली. मागील काही दिवसांपूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्याने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांच्या विश्वस्तांसोबत शांतता बैठक घेतली होती. त्यात भोंगे काढण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात एका घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत अधीक्षक कुलकर्णी यांनी सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प...

**बार्शी : बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी द्विदिवसीय राजयोग तपस्या कार्यक्रमाचा शुभारंभ**

इमेज
*बार्शी : बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी द्विदिवसीय राजयोग तपस्या कार्यक्रमाचा शुभारंभ*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २८ फेब्रुवारी : सोलापूर उपक्षेत्रातील बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्रात आजपासून द्विदिवसीय राजयोग तपस्या (योग भट्टी) कार्यक्रम सुरू झाला. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेले तपस्वी कुमार व प्रेरक वक्ते ब्रह्मकुमार राजीव गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज सायंकाळी ११.३० वाजता सेवाकेंद्राच्या नवनिर्मित राजयोग भवनात झाले. सेवाकेंद्र संचालिका ब्रह्मकुमारी संगीता दिदी, ब्रह्मकुमार राजीव गुप्ता आणि सोलापूर उपक्षेत्रातील राजयोग शिक्षिका बहिणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संगीता दिदी व निशा दिदी यांनी राजीव गुप्ता व सर्व राजयोग शिक्षिका बहिणींचे तिलक, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन स्वागत केले. स्वागतपर मनोगतात संगीता दिदी म्हणाल्या, “राजीवभाईंच्या सान...

*तुळजाभवानी मंदिरात होळी व चंद्रग्रहणामुळे पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल*

इमेज
*तुळजाभवानी मंदिरात होळी व चंद्रग्रहणामुळे पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल*  *KDM NEWS प्रतिनिधी तुळजापूर : होळी (शिमगा) सण आणि ३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. मंदिर प्रशासनाने महंत, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. मंदिराचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, *२ मार्च २०२६ (सोमवार)* रोजी होळी सणानिमित्त अभिषेक पूजेची घाट सायंकाळी ६.०० वाजता होईल. त्यानंतर रात्री ८.०० वाजता आरती व धुपारती करण्यात येईल. *३ मार्च २०२६ (मंगळवार)* रोजी सायंकाळी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे (दुपारी ३.२० ते सायंकाळी ६.४७ पर्यंत) पूजा-विधींमध्ये खास बदल करण्यात आले आहेत. ग्रहणकाळात मंदिरातील पूजा बंद राहते आणि देवीला सोवळ्यात ठेवण्याची परंपरा पाळली जाते. यानुसार वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल : - सायंकाळी ६.१५ ते ६.४० : घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेवीजवळ येणे व निर्माल्य विसर्जन. - ६.४४ ते ६.४८ : चंद्रग्रहण कालावधीत श्रीदे...

*बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मंजूर; करवाढ नाही, तरीही सभेत जोरदार आरोप-प्रत्यारोप*

इमेज
*बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मंजूर; करवाढ नाही, तरीही सभेत जोरदार आरोप-प्रत्यारोप*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. दुपारी १ वाजता सुरू झालेली ही सभा दुपारी ४.१५ वाजता संपली. सभेत नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात महसुली व भांडवली जमेसह शासन अनुदान, कर्ज स्वरूपातील मदत धरून एकूण ५१२ कोटी ८६ लाख ४२ हजार ४०४ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रारंभिक शिल्लक मिळून ही तरतूद करण्यात आली आहे. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी पिठासन अधिकारी म्हणून अभिभाषणात सांगितले की, महिलांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोणतीही करवाढ किंवा दरवाढ न करता हा अर्थसंकल्प सादर केला आहे. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी ४३ मिनिटांचे अभ्यासपूर्...

*सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबिया संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती*

इमेज
*सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबिया संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २७ फेब्रुवारी :** सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबियातील संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय भारतीय शिष्टमंडळ ६ ते १० मार्च २०२६ दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात दौऱ्यावर जाणार असून, ८ मार्चला होणाऱ्या काँग्रेस (संसदीय) निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे. कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral (राष्ट्रीय निवडणूक परिषद) कडून भारत निवडणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य उपक्रमांतर्गत हे आमंत्रण प्राप्त झाले आहे. शिष्टमंडळात कुमार आशीर्वाद यांच्यासोबत संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर रामचंद्र पारकर, रामटेकचे निवडणूक नोंदणी अधिकारी प्रीयेश महाजन आणि नाशिकचे बूथ लेव्हल अधिकारी सागर शिर्के यांचा समावेश आहे. दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता, तंत्...

*नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना तहसिलदार पदावर बढती; २०२५-२६ निवडसूचीत आरक्षण वादानंतर विशेष तरतूद*

इमेज
*नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना तहसिलदार पदावर बढती; २०२५-२६ निवडसूचीत आरक्षण वादानंतर विशेष तरतूद*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २७ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र महसूल विभागाने नायब तहसिलदार संजीवन मच्छिंद्र मुंढे यांना तहसिलदार पदावर *तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती* जाहीर केली आहे. ही पदोन्नती २०२५-२६ च्या निवडसूचीतील विशेष प्रकरणातून देण्यात आली असून, शासन आदेश क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१९/आस्था-३ (दिनांक २७ फेब्रुवारी २०२६) नुसार लागू झाली आहे.   श्री. मुंढे यांना नायब तहसिलदार संवर्गातील वेतनश्रेणी एस-१४ (रु. ३८,६००-१,२२,८००) वरून तहसिलदार संवर्गातील एस-१९ (रु. ५५,१००-१,७५,१००) वर ही बढती मिळाली आहे. ही बढती *केवळ तात्पुरती*असून, त्यामुळे नियमित पदोन्नती किंवा ज्येष्ठतेचा कोणताही कायमस्वरूपी हक्क निर्माण होणार नाही.   प्रकरणाची माहिती   २०२५-२६ च्या निवडसूचीत ८५ नायब तहसिलदार तहसिलदार पदासाठी पात्र ठरले होते. काही अधिकाऱ्यांनी आरक्षण लाभ घेतल्याबाबत आक्षेप घेतले होते. श्री. मुंढे यांना सुरुवातीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पदोन्नती नाक...

*नांदेड येथे २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार*

इमेज
*नांदेड येथे २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार*  *KDM NEWS प्रतिनिधी नांदेड, ता. २७ : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात बार्शीचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च या तीन दिवसांत नांदेडच्या सायन्स कॉलेज ग्राउंडवर होणाऱ्या या संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कॉम्रेड ठोंबरे यांनी सातत्याने मार्क्स-फुले-आंबेडकरवादी विद्रोही विचारधारेने दलित, कामगार, शेतकरी, विद्यार्थी व युवक चळवळींमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००५ साली सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते, जे जिल्ह्यातील सर्वात गाजलेले संमेलन ठरले. २०१५ मध्ये बार्शी येथे झालेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते संयोजन समिती अध्यक्ष होते. त्यांच्या साहित्यिक योगदानात महात्म...

*७२ वर्षीय आजोबांनी ठणकावले: निकृष्ट कामे, बोगस बिले – मरायला तयार, पण भ्रष्टाचार सहन करणार नाही!*

इमेज
*७२ वर्षीय आजोबांनी ठणकावले: निकृष्ट कामे, बोगस बिले – मरायला तयार, पण भ्रष्टाचार सहन करणार नाही!*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २७ : बार्शी तालुक्यातील भोईंजे गावात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांविरोधात ७२ वर्षीय सौदागर विष्णू डांगरे यांनी रामलिंग मंदिरात २५ फेब्रुवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरू असून, त्यांच्या ठाम भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि पाठिंब्याची लाट पसरली आहे. डांगरे यांनी स्पष्ट सांगितले की, गावातील प्रत्येक विकासकाम ठेकेदारांच्या खिशात जाण्यासाठी केले गेले आहे, लोकांच्या हितासाठी नव्हे. मुख्य आरोप आणि तक्रारी खालीलप्रमाणे: - शासनाच्या आदेशानुसार ठेवायच्या कचराकुंड्या योग्य ठिकाणी नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य. - भुयारी गटारीसमोर चुंबळीचे स्वीस खड्डे बांधणे अनिवार्य असताना ते पूर्णपणे दुर्लक्षित; खड्डे कच्च्या, निकृष्ट विटांनी बांधले. - राष्ट्रीय महामार्गाशेजारील गट नंबर ५७ मधील जमिनीवर सडकेपासून फक्त ५-६ फूट अंतरावरच खड्डे कच्च्या विटांनी उभारले – सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. - भुयारी गटारीचे कामच केले ...

*कुसळंब गोळीबार प्रकरण: बार्शी तालुका पोलिसांची ५ तासांची शोधमोहीम यशस्वी;फायरिंग टोळीतील ३ आरोपी अटकेत, हत्यारे जप्त*

इमेज
*कुसळंब गोळीबार प्रकरण: बार्शी तालुका पोलिसांची ५ तासांची शोधमोहीम यशस्वी; फायरिंग टोळीतील ३ आरोपी अटकेत, हत्यारे जप्त* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :* बार्शी तालुका पोलीस ठाण्याने गुरुवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी ३.२० वाजता एका धाडसी कारवाईत फायरिंग करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना जेरबंद केले. मौजे कुसळंब येथे किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण व पिस्तुलाने गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात ही टोळी गुन्हेगारी करून पळून गेली होती. पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ५ तासांच्या सतत पाठलागानंतर आरोपींसह देशी पिस्तुल, जिवंत काडतूस, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व गुन्ह्यात वापरलेले ह्युंडाई ऑरा कार जप्त केले. *गुन्ह्याची हकीकत* २६ फेब्रुवारीला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर ६४/२६ दाखल झाला होता. आरोपींनी कुसळंब येथे एका व्यक्तीवर किरकोळ वादातून हल्ला केला. पिस्तुलाने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून शस्त्र अधिनियम कलम ३ व २७ तसेच बीएनएस कलम १०९(१), ११८(१) व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस न...

*बार्शी तालुक्यातील रुई येथे १७ वर्षीय मुलीचा खून; प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनी ओढणीने गळा आवळला, कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव*

इमेज
*बार्शी तालुक्यातील रुई येथे १७ वर्षीय मुलीचा खून; प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनी ओढणीने गळा आवळला, कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव*  *KDM NEWS वैराग (प्रतिनिधी):* सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रुई गावात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजदरम्यान १७ वर्षे तीन महिने वयाच्या श्रावणी राजेंद्र नरसुडे हिचा तिच्याच वडिलांनी ओढणीने गळा आवळून जाणीवपूर्वक खून केल्याची धक्कादायक घटना तीन महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून करण्यात आला असून, नंतर घरातील कीटकनाशक औषध पाजून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. वैराग पोलिसांनी तपासानंतर आरोपी वडिल राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय ३४, रा. रुई) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, बार्शी सत्र न्यायालयाने त्यांना २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   श्रावणी बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिच्या एका मुलासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय वडिलांना आल्याने त्यांनी घरीच मुलीचा गळा ओढणीने आवळला. खूनानंतर आत्महत्येचा आभास निर्माण करण्यासाठी तिला कीटकनाशक पाजले. मुलीला उपचारासा...

*बार्शी कुसळंब गावात प्रेमप्रकरणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; पिस्तूलने दोन गोळ्या झाडल्या, दोन अज्ञातांसह मुख्य आरोपी फरार*

इमेज
*बार्शी कुसळंब गावात प्रेमप्रकरणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; पिस्तूलने दोन गोळ्या झाडल्या, दोन अज्ञातांसह मुख्य आरोपी फरार*    **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २६ फेब्रुवारी २०२६ ** - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात आज सायंकाळी एका प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. आरोपी योगेश भास्कर मोरे आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण करून आणि पिस्तूलने दोन वेळा गोळ्या झाडून पीडित बाळासाहेब नंदकुमार उकिरडे याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडिताचा भाऊ श्रावणलाही पिस्तूल रोखून धमकी देण्यात आली. बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(३) आणि (८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. घटनेच्या तपशीलानुसार, २४ वर्षीय बाळासाहेब उकिरडे हा कुसळंब गावातील रहिवासी असून, शेती आणि कडबा व्यापार करतो. तो पोलीस भरतीची तयारी करत असून, त्याच्या कुटुंबात आई भाग्यश्री, वडील नंदकुमार, भाऊ श्रावण आणि वहिनी नम्रता यांचा समावेश आहे. सुमारे एक वर्षापूर्वी बार्शीतील श्री करिअर अॅकॅ...

*भारताने झिम्बाब्वेविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; टी-२० विश्वकप इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या*

इमेज
*भारताने झिम्बाब्वेविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; टी-२० विश्वकप इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या*  *KDM NEWS प्रतिनिधी चेन्नई, २६ फेब्रुवारी २०२६: टी-२० विश्वकप २०२६ मधील सुपर-१२ टप्प्यातील एका करो-या-मरो सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दमदार फलंदाजी करत ४ बाद २५६ धावा उभारल्या. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. या विजयाने भारताचा सेमीफायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, कारण अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने भारतासाठी मार्ग मोकळा झाला होता. आता भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ सेमीफायनलसाठी स्पर्धेत आहेत, तर झिम्बाब्वे आधीच बाद झाला आहे. भारतीय संघाने या सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल केले. अक्षर पटेल आणि इशान किशन यांना संघात स्थान देण्यात आले, तर रिंकू सिंहला बाहेर बसवण्यात आले. सलामीवीर अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात करत ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली, ज्यात ६ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. दुसऱ्...

**फार्मसी महाविद्यालयांना १ मार्चपर्यंत आधार-लिंक्ड बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याचे कठोर आदेश**

इमेज
*फार्मसी महाविद्यालयांना १ मार्चपर्यंत आधार-लिंक्ड बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याचे कठोर आदेश* *KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०२६: फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ने देशातील सर्व मंजूर औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना **आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली* (AEBAS - Aadhaar Enabled Biometric Attendance System) १ मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे लागू करण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. या मुदतीनंतर नियमांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांना *२०२६-२७ शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रवेशासाठी प्रशासकीय मान्यता*(Approval to make admissions) मिळणार नाही, अशी स्पष्ट चेतावणी पीसीआयने दिली आहे. पीसीआयच्या २० फेब्रुवारी २०२६ च्या परिपत्रकानुसार (फाइल क्रमांक IT-12/3/2025-IT), ही प्रणाली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या २१ मार्च २०२५ च्या अधिसूचनेनुसार (S.O. 1362(E)) अनिवार्य करण्यात आली आहे. संस्थांना खालील मुख्य पायऱ्या पूर्ण करणे बंधनकारक आहे: - संस्थेची नोंदणी **central.pci.ac.in*या केंद्रीकृत पोर्टलवर करणे. - STQC प्रमाणित बायोमेट्रिक डिव्हाइसेस खरेदी करून...

**बदलापुरातील स्त्री बीज विक्री रॅकेटचे राज्यव्यापी जाळे उघड; अवैध IVF केंद्रांवर कडक कारवाईचे आदेश**

इमेज
*बदलापुरातील स्त्री बीज विक्री रॅकेटचे राज्यव्यापी जाळे उघड; अवैध IVF केंद्रांवर कडक कारवाईचे आदेश*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २६ फेब्रुवारी : ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात उघडकीस आलेल्या अवैध स्त्री बीज काढणी आणि विक्री रॅकेटचे पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असल्याचा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली असून, राज्यातील सर्व अवैध IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन), सोनोग्राफी केंद्रे आणि स्त्रीरोग तसेच प्रसूती रुग्णालयांची कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे रॅकेट आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि घरगुती अडचणीत असलेल्या महिलांना पैसे देण्याचे आमिष दाखवून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण एका महिलेने आरोग्य केंद्रात जाऊन तक्रार केल्यानंतर उघडकीस आले. तिने दावा केला की, तिला बीज दान प्रक्रियेसाठी पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण ते दिले गेले नाहीत. यानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई करत बदलापुर आणि उल्हासनगरमधील निवासी जागांवर छापे टाकले. तेथे ओव्हुलेशन उत्ते...

*बार्शी तालुक्यात महसूल समस्यांचे तात्काळ निराकरण; 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानाचा प्रारंभ*

इमेज
*बार्शी तालुक्यात महसूल समस्यांचे तात्काळ निराकरण; 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानाचा प्रारंभ*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २५ फेब्रुवारी २०२६ ** - महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शिवजयंतीच्या निमित्ताने सुरू केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' अंतर्गत बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात विविध मंडळ स्तरावर एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान टप्पा क्रमांक १ असून, मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबवले जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राज्यभरात सुरू असून, त्याचा मुख्य उद्देश महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान बनवणे हा आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसूल संबंधित तक्रारींना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी हे शिबिरे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या अभियानाची सुरुवात १८ फेब्रुवारी २०२६ पासून झाली असून, राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात मंडळ तसेच नगरपालिका, नगरपंचायत स्तरावर शिबिरे भरवली जाणार आहेत...

*धाराशिवमध्ये म्हशी चोरणारी टोळी जेरबंद: दोन आरोपी अटकेत, ८ म्हशींसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ गुन्हे उघड*

इमेज
*धाराशिवमध्ये म्हशी चोरणारी टोळी जेरबंद: दोन आरोपी अटकेत, ८ म्हशींसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ गुन्हे उघड*  *KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव, २४ फेब्रुवारी: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य करून म्हशी चोरी करणाऱ्या एका संघटित टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८ म्हशी, एक ट्रक आणि एक पिकअप वाहन असा एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या अटकेमुळे जिल्ह्यातील म्हशी चोरीचे तब्बल १३ गुन्हे उघडकीस आले असून, शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई राबवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी तालुक्यातील ढोकी गावाजवळील एका गोदामावर छापा टाकला. तेथे आरोपींना म्हशी लपवून ठेवलेल्या आढळल्या. आरोपींची नावे आहेत: १) राजू बाबुराव जाधव (वय ३२, रा. ढोकी, ता. वाशी) आणि २) संजय लक्ष्मण काळे (वय २८, रा. तुळजापूर). हे दोघेही सराईत असून, गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध ...

*बार्शीत शिवजयंतीनंतर हिंसाचाराची मालिका; मारहाण, दगडफेक अन् रुग्णालयाची तोडफोड*

इमेज
*बार्शीत शिवजयंतीनंतर हिंसाचाराची मालिका; मारहाण, दगडफेक अन् रुग्णालयाची तोडफोड*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. २३ :*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित कार्यक्रमानंतर किरकोळ वादाचे पर्यवसान गंभीर हिंसाचारात झाले. रविवारी रात्री सलग तीन ठिकाणी मारहाण, दगडफेक आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, प्रत्यक्ष १५ आणि अज्ञात १४ अशा एकूण २९ जणांवर कारवाई सुरू आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या तिन्ही घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये भांडण उफाळले. यात एका तरुणाला आणि त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोमेश्वर स्वामी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये ९ ज्ञात आणि ३ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन...

*बार्शी प्रेस क्लबला नवं अध्यक्ष! सचिन अपसिंगकर एकमताने निवडले; टीममध्ये करडे-गोडसे-पवार-घोलप*

इमेज
*बार्शी प्रेस क्लबला नवं अध्यक्ष! सचिन अपसिंगकर एकमताने निवडले; टीममध्ये करडे-गोडसे-पवार-घोलप*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २३ : बार्शीतील दैनिक वृत्तपत्रांच्या पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी 'सुराज्य' दैनिकाचे सचिन अपसिंगकर यांची एकमताने निवड झाली आहे. या निवडीसोबतच उपाध्यक्षपदी चंद्रकांत करडे, सचिवपदी गणेश गोडसे, खजिनदारपदी उमेश पवार आणि सहसचिवपदी गणेश घोलप यांचीही निवड करण्यात आली. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असून, क्लबच्या कार्यकारिणीला नवे नेतृत्व मिळाले आहे. समर्थ व्यायाम शाळेत रविवारी (दि. २२) सायंकाळी झालेल्या वार्षिक सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. सभेला शहरातील प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी 'तरुण भारत'चे अरुण बळप होते. ज्येष्ठ पत्रकार एन. आर. कुलकर्णी यांनी या वेळी मार्गदर्शन केले, ज्यात पत्रकारितेच्या आव्हानांबाबत चर्चा झाली. निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा तपशील असा आहे: अध्यक्ष - सचिन अपसिंगकर ('सुराज्य'), उपाध्यक्ष - चंद्रकांत करडे ('दिव्य मराठी'), सचिव - गणेश गो...

*माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई; ५ हजार रुपयांसह रंगेहात पकडले*

इमेज
*माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई; ५ हजार रुपयांसह रंगेहात पकडले*  *KDM NEWS माळशिरस प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराच्या घटनांना रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर यांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव उत्तम नागटिळक (वय ५६, राहणार टाकळी रोड, पंढरपूर) यांना ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. हे प्रकरण एका तक्रारदाराने माळशिरस तालुक्यातील गावात बांधलेल्या सभामंडपाच्या कामाशी निगडित आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 'पूर्णत्वाचा दाखला' (Completion Certificate) मिळवण्यासाठी तक्रारदाराने पंचायत समितीकडे अर्ज केला होता. मात्र, वरिष्ठ सहाय्यक नागटिळक यांनी हा दाखला देण्यासाठी प्रथम १०,००० रुपये लाच मागितली. तक्रारदाराने वाटाघाटी केल्यानंतर रक्कम ५,००० रुपयांपर्यंत आणण्यात आली. लाच देण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने एसीबी सोलापूरकडे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची सखोल चौकशी केली. त्यात लाच मागणीची पुष्टी झाल्यानंतर स...

*ऑस्ट्रेलियन इव्हॉल्व कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये 300 कोटींचा प्रकल्प*

इमेज
*ऑस्ट्रेलियन इव्हॉल्व कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये 300 कोटींचा प्रकल्प*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, दि. २३ फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाची प्रमुख कंपनी इव्हॉल्वने महाराष्ट्रात गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी राज्यातील नवी मुंबई, पुणे आणि नागपूर परिसरात सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून १ हजार ७५ लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. कंपनीने राज्य सरकारसोबत याबाबतचा करार नुकताच पूर्ण केला असून, उद्योग विभागाने याची माहिती दिली. या कराराचे हस्तांतरण मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी इव्हॉल्व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनीच्या गुंतवणुकीच्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "महाराष्ट्राची वेगवान विकास गती आणि कुशल मनुष्यबळ आम्हाला आकर्षित करत आहे. ही गुंतवणूक तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी आहे, ज्यामुळे स्थानिक तरुणांना उच्च दर...

*“नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाची दमदार सुरुवात*

इमेज
*“नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाची दमदार सुरुवात*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ फेब्रुवारी २०२६ : स्पर्धेच्या जगात केवळ पदवी पुरेशी नाही, कौशल्य आणि उद्योजकतेचा दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये आज उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा एक आठवड्याचा उपक्रम २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान चालणार असून, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा देणार आहे. उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम शेठ कांकरिया उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एम. ए. ढगे, प्रा. एन. आर. सरफळे आणि इतर मान्यवर होते. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शि...

*बार्शी शहरात शिवजयंती उत्सवात फटाक्यांमुळे हिंसक वाद; युवक व महिलेला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड*

इमेज
*बार्शी शहरात शिवजयंती उत्सवात फटाक्यांमुळे हिंसक वाद; युवक व महिलेला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. २३ फेब्रुवारी २०२६ : शहरातील बारंगुळे प्लॉट परिसरात शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना फटाके वाजवल्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ वाद झाला. या वादात एका युवकासह महिलेला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात महिला गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली, ज्यात खिडक्या, दरवाजे आणि वैद्यकीय उपकरणांचे नुकसान झाले. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची पार्श्वभूमी अशी की, शिवजयंतीनिमित्त बारंगुळे प्लॉटमध्ये स्थानिक नागरिक उत्सव साजरा करत होते. फटाके फोडण्यावरून शेजारच्या एका गटाने आक्षेप घेतला आणि 'आम्हाला त्रास होतो' असे सांगून भांडण सुरू झाले. या भांडणात युवक आणि महिलेला लाठ्या-काठ्या व हाताने मारहाण करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनुसार, मारहाण इतकी तीव्र होती की, महिलेच्या डोक्याला व...

*मोहोळ एसटी स्टँडसमोर संभाजी महाराज पुतळा प्रकरण तापले; प्रशासनाच्या हटवण्याच्या प्रयत्नांना स्थानिकांचा जोरदार विरोध, तणाव वाढला*

इमेज
*मोहोळ एसटी स्टँडसमोर संभाजी महाराज पुतळा प्रकरण तापले; प्रशासनाच्या हटवण्याच्या प्रयत्नांना स्थानिकांचा जोरदार विरोध, तणाव वाढला*  *KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ : मोहोळ शहरातील एसटी बस स्थानकासमोरील चौकात रात्रीच्या अंधारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीरपणे उभारण्यात आला. शंभूप्रेमी म्हणवणाऱ्या काही व्यक्तींनी ही कृती केली असून, कोणत्याही सरकारी विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. सकाळी ही बाब लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने पुतळा काढण्यासाठी पावले उचलली, मात्र याला शहरवासीयांकडून जोरदार विरोध होत असून, परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत येते. त्यामुळे कायद्याच्या दृष्टिकोनातून या अनधिकृत उभारणीस वैधता नाही. पुतळा काढण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यास पुतळा हटवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. दरम्यान, या निर्णयाला मोहोळवासी...

*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन**

इमेज
*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन* **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या पुतळ्यावरून वाद चिघळला. विरोधकांनी पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, दगडफेक झाली आणि महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हिंसक घटनेत उबाठा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांसह अनेक महिलांना मारहाण झाली. गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. या निंदनीय घटनेचा निषेध करत बार्शी युवा सेनेने तहसील कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिले. सरपंच व सहभागींवर  *मोक्का* अंतर्गत तत्काळ कारवाई आणि अटक करण्याची मागणी केली. शासनाने कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींचा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन पाटील, युवती सेनेच्या रजनी पाटील, नगरसेवक आकाश राऊत...

**बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल**

इमेज
*बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल* **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढोराळे गावातील भोगावती नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करताना तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि एक जेसीबी जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. मंडळ अधिकारी सारिका धोंडीराम राऊत (वय ३६, रा कासारवाडी रोड, बार्शी यांनी दिलेल्या जबाबानुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता तहसील कार्यालय बार्शी येथून तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने ढोराळे येथील भोगावती नदीपात्राची तपासणी केली. पथकात मंडळ अधिकारी सौंदरे यू. एच. डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी सौंदरे मोहिते, कुसळम औदुंबर शिंदे, वैराग सचिन शिंदे, देवगाव विनोद मुंढे, ढोराळे रमाकांत देशमुख आणि वैराग पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल २२१२ चव्हाण व १०८४ पठाण यांचा...

*बार्शी शहरात पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल, रोकड व दागिने लुटले*

इमेज
*बार्शी शहरात पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल, रोकड व दागिने लुटले*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : शहरातील उपाळाई रोड भागात जुन्या वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला होऊन घराची तोडफोड करण्यात आली. या घटनेत तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत झाली, तसेच १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट झाली. बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे. फिर्यादी गणेश अरुण बोरगावकर (वय ३८, रा. उपाळाई रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नातेवाईकांसंबंधीचा जुना वाद आरोपींनी उकरून काढला. एक तरुणी पुन्हा बेपत्ता झाल्याच्या संशयावरून आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबावर रोष धरला. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या नातेवाईकांच्या घरासमोर धडकले आणि वाद घालू लागले. यावेळी त्यांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हल्ल्यात तलवारीने वार...

*मुंबई मंत्रालय लाचखोरी प्रकरण: नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन; प्रतिनियुक्ती रद्द, खासगी सचिवही हटवले*

इमेज
*मुंबई मंत्रालय लाचखोरी प्रकरण: नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन; प्रतिनियुक्ती रद्द, खासगी सचिवही हटवले*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० फेब्रुवारी: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक झालेल्या लिपिक राजेंद्र (राजू) ढेरिंगेला मुंबई सत्र न्यायालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ढेरिंगेला १२ फेब्रुवारीला मंत्रालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते, ज्यात त्याने औषध दुकानाच्या निलंबित परवान्याला स्थगिती देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. न्यायालयाने अटकेनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र जामीन अर्जावर सुनावणी घेत दिलासा दिला. दरम्यान, मंत्री झिरवाळ यांनी ढेरिंगेची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याला मूळ विभागात पाठवले असून, खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांनाही पदमुक्त करून कृषी विभागातील मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुरुवात ७ फेब्रुवारीला झाली, जेव्हा एका तक्रारदाराने (नाम निर्मल शर्मा, एका औषध दुकानाचे मालक) आपल्य...

*तहसीलदार मुंढे लाचखोरी प्रकरणात ACB च्या जाळ्यात; ५० हजारांची मागणी, २० हजारांवर सौदा*

इमेज
*परळी तहसीलदार व्यंकटेश मुंढे लाचखोरी प्रकरणात ACB च्या जाळ्यात; ५० हजारांची मागणी, २० हजारांवर सौदा*  *KDM NEWS प्रतिनिधी बीड, २० फेब्रुवारी :* बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत तहसीलदार व्यंकटेश मुंढे  यांना लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले. एका तक्रारदाराकडून 'सालंसी प्रमाणपत्र' (ऐपतीचे प्रमाणपत्र किंवा solvency certificate) देण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपयांवर आणण्यात आली होती. तक्रारदाराने ACB कडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला आणि मुंडे यांना जाळ्यात अडकवले. कारवाई दुपारी परळी तहसील कार्यालयातच पार पडली. ACB च्या पथकाने तक्रारदाराच्या माध्यमातून पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी पैसे थेट स्वीकारले नाहीत, पण लाच मागितल्याचा पुरावा आणि तक्रार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ACB च्या उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून, पथकाने कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर प...

*एसटी महामंडळाला नवे पंख: ८३०० नवीन बसेस जोडून आर्थिक संकटावर मात करण्याचा निर्धार*

इमेज
*एसटी महामंडळाला नवे पंख: ८३०० नवीन बसेस जोडून आर्थिक संकटावर मात करण्याचा निर्धार*  *KDM NEWS मुंबई, २० फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या योजनेला गती देत आहे. दररोज १ ते १.५ कोटी रुपयांच्या महसुली तुटीत अडकलेल्या एसटीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न आपोआप वाढेल. वर्षाअखेरपर्यंत महामंडळ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. कोविडपूर्व काळात एसटीच्या ताफ्यात १८ ते १९ हजार बसेस होत्या आणि दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी प्रवास करत असत. महामारी, कर्मचारी संप आणि बस खरेदी प्रक्रियेच्या मंद गतीमुळे सध्या ताफ्यात फक्त १२,६०० बसेस उपलब्ध आहेत. यामुळे सेवा अपुरी पडत असून, दररोज फक्त ५० लाख प्रवासी लाभ घेत आहेत. खर्च ३४-३५ कोटी रुपये असताना उत्पन्न केवळ ३३...

*अजित पवार निधनानंतर अल्पसंख्याक विभागातील घोटाळा; फडणवीसांची कठोर कारवाई*

इमेज
*अजित पवार निधनानंतर अल्पसंख्याक विभागातील घोटाळा; फडणवीसांची कठोर कारवाई*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६** - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विकास विभागात घडलेल्या अनियमिततेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच विभागाने स्थगित असलेल्या ७५ शिक्षण संस्थांच्या फाईलींवर स्वाक्षऱ्या करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे जारी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंजुरी तात्काळ स्थगित केल्या असून, दोषी अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचे प्रभार होते. मागील वर्षी ऑगस्टपासून या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, २८ जानेवारी दुपारी ३.०९ वाजता पहिले प्रमाणपत्र जारी झाले. त्यानंतर २९-३० जानेवारी आणि २ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७५ संस्थांना दर्जा देण्यात आला. यात काही प्रमाणपत्रे सायंकाळी उशिरा ६.४५ ते ६.५८ वाजता जारी झाली. राज्या...