पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

**बार्शीतील तरुणाई अवैध धंदे व व्यसनाच्या गर्तेत; तीन वर्षांत ५० हून अधिक तरुणांनी व्यसनासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारला**

इमेज
**बार्शीतील तरुणाई अवैध धंदे व व्यसनाच्या गर्तेत; तीन वर्षांत ५० हून अधिक तरुणांनी व्यसनासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला**  **KDM NEWS बार्शी प्रतिनिधी** बार्शी : एकीकडे बार्शी शहरातील उद्योग-व्यवसायाची होत चाललेली दयनीय अवस्था, बेरोजगारीने ग्रासलेले सुशिक्षित तरुण, नवीन व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल आणि जागेचा अभाव अशी अनेक संकटे तरुणांसमोर उभी आहेत. दुसरीकडे मटका, क्रिकेट सट्टा, चक्री गेम, गुटखा, गांजा, ब्राउन शुगरसारखी ड्रग्स, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांचे जाळे शहरात तालुक्यात घट्ट विणले गेले आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या तीन वर्षांत व्यसनासाठी कर्जबाजारी झालेल्या सुमारे ५० ते ५५ तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, गल्ल्या आणि उपनगरांमध्ये मटका केंद्रे बिनदिक्कत चालू आहेत. गुटखा आणि गांजा तर अगदी किराणा दुकानांपासून ते चहा टपऱ्यांवरही सहज मिळतो. क्रिकेट सट्टा आणि ऑनलाइन चक्री गेम्सच्या आहारी गेलेले अनेक तरुण रात्रंदिवस मोबाईलवर...

**२६/११ च्या हुतात्म्यांना रक्ताचेच आरपण! बार्शी पोलिसांच्या शिबिरात १११ बाटल्या भरल्या**

इमेज
**२६/११ च्या हुतात्म्यांना रक्ताचेच आरपण! बार्शी पोलिसांच्या शिबिरात १११ बाटल्या भरल्या**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर), दि. २६ नोव्हेंबर : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज मोठे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला पोलीस दलासह शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. एकूण १११ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून हुतात्म्यांना खरी आदरांजली वाहिली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि थेट मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर यांनी सकाळपासूनच शिबिरस्थळी उपस्थित राहून सर्व व्यवस्था पाहिली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस स्टाफ सक्रिय झाला होता. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात पोलीस उपनिरीक्षक, हव...

**विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष हेल्पलाइन सुरू; बस उशिरा सुटली तर अधिकारी निलंबित होणार – प्रताप सरनाईक यांचे कठोर आदेश**

इमेज
**विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष हेल्पलाइन सुरू; बस उशिरा सुटली तर अधिकारी निलंबित होणार – प्रताप सरनाईक यांचे कठोर आदेश**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, २६ नोव्हेंबर : शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा एसटी प्रवासात कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष हेल्पलाइन क्रमांक १८०० २२१ २५१ सुरू केला आहे. हा निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतला असून, बस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काटेकोर दखल घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. “एसटीची बस उशिरा सुटली किंवा रद्द झाली तर विद्यार्थ्यांचा तास चुकतो, परीक्षेला उशीर होतो, कधी कधी महत्त्वाची परीक्षाच हुकते. हे सहन केले जाणार नाही. अशा प्रकरणी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना थेट जबाबदार धरण्यात येईल,” असे ठाम प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांचा आढावा : - सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ५ ते ६ य...

**संविधान दिनाला बार्शीत उत्साहाचे वातावरण; बी.पी. सुलाखे महाविद्यालयात युवकांना लोकशाहीची शपथ**

इमेज
**संविधान दिनाला बार्शीत उत्साहाचे वातावरण; बी.पी. सुलाखे महाविद्यालयात युवकांना लोकशाहीची शपथ**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधानाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील बी.पी. सुलाखे कॉमर्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “संविधानाची शक्ती, युवकांची ताकद” या संकल्पनेतून साजरा झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेने सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे व प्रा. के. एम. माळी, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब पाटील, संगणक विभागप्रमुख बाळासाहेब लिंगे, ज्युनियर कॉलेज समन्वयक पोहळकर, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. रोहित डिसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक...

**बार्शी बसस्थानकावर पुन्हा चोरी : महिलेच्या पर्समधून तीन तोळे सोने व १५०० रुपये लंपास**

इमेज
**बार्शी बसस्थानकावर पुन्हा चोरी : महिलेच्या पर्समधून तीन तोळे सोने व १५०० रुपये लंपास**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ** (जि. सोलापूर) : बार्शी शहरातील राज्य परिवहन बसस्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेच्या सुमारास बसस्थानकातच गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून उघडकीस आली आहे. फिर्यादी आश्विनी कपील हिंगमिरे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर, बार्शी) या बार्शी येथील खासगी कर्करोग रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती हे बार्शी येथील ब्लड बँकेत कर्मचारी आहेत. मंगळवारी दुपारी त्या आपल्या आईसोबत माहेरच्या गावी कळंब येथे जाण्यासाठी बार्शी एसटी बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये सीट मिळाल्यानंतर आश्विनी यांनी आईची बॅग (पर्स) तपासली असता बॅगेची झिप उघडी असल्याचे व त्यातील दोन लहान लाल-काळ्या रंगाच्या पर्स पूर्णपणे गायब असल्याचे लक्ष...

**ओबीसी आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्या, पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला**

इमेज
**ओबीसी आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्या, पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला**  **KDM NEWS प्रतिनिधी**नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर : महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील टांगती तलवार कायम राहिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवारी) झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आणखी वेळ मागितल्याने खंडपीठाने प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार २८ नोव्हेंबरला ठेवली आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, बांठिया आयोगाच्या शिफारशींनुसार आरक्षणाची आकडेवारी तयार करताना सद्भावनेने प्रयत्न केले असले तरी काही त्रुटी राहिल्या असल्याचे मान्य केले आणि एक-दोन दिवसांची मुदत मागितली. डिसेंबरमध्ये २४६ नगरपरिषद-नगरपंचायती आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अर्जप्रक्रियाही पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी न्यायालय...

**बार्शी मार्केट यार्डात अडत व्यापाऱ्याची ११.६९ लाखांची फसवणूक; मुनीम सागर फपाळवर विश्वासघाताचा गुन्हा दाखल**

इमेज
**बार्शी मार्केट यार्डात अडत व्यापाऱ्याची ११.६९ लाखांची फसवणूक; मुनीम फपाळवर विश्वासघाताचा गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका नामांकित अडत व्यापाऱ्याच्या नावाने तब्बल ११ लाख ६९ हजार ४७० रुपयांचा भुसार माल परस्पर खरेदी करून तो माल गायब करणाऱ्या मुनीमावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात विश्वासघात व अपहाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २६ एप्रिल २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ या सुमारे सात महिन्यांच्या कालावधीत घडला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुनीमाचे नाव सागर लक्ष्मण फपाळ (वय ३०, रा. फपाळवाडी, ता. बार्शी) असे आहे. तर फिर्यादी व्यापारी सचिन देविदास मडके (वय ४२, रा. दत्तनगर, बार्शी) हे मार्केट यार्डातील प्लॉट क्रमांक ११२ येथे ‘सचिन मडके अडत’ नावाने उडीद, तूर, चिंच आदी भुसार मालाचा अधिकृत परवानाधारक अडत व्यापारी आहेत. सचिन मडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर फपाळ हा २०१६ पासून त्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम करीत होता. खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार, बाजारातील माल खरेदीचे अधिकार त्याच्याकडे होते. १५ ऑक्...

**लिपिकाला थकीत पगार काढून देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात**

इमेज
**लिपिकाला थकीत पगार काढून देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी**इंदापूर (जि. पुणे) :** मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), फलटण-इंदापूर येथील प्रमुख लिपिक अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. राजवेली, ता. इंदापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने रंगेहाथ पकडले. वसतिगृह अधीक्षकाचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ असे तीन महिन्यांचे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात त्याने प्रथम तीन हजार रुपये लाच मागितली होती. नंतर दोन हजार रुपयांवर तो तयार झाला आणि सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी २.४८ वाजता संस्थेच्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच एसीबीने त्याला ताब्यात घेतले. तक्रारदार हे मालोजीराजे आयटीआयमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले होते. ते वेतन काढून देण्यासाठी आणि पुढे कामात सहकार्य करण्यासाठी प्रमुख लिपिक अनमोल शिंगे यांनी वारंवार तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास पुढील सर्व कामात अडथळे निर्माण करू, अशी धमकीही दिली. अखेर कंटाळून तक्रारदारांनी १९ नोव्हेंबर ...

**इथियोपियातील ज्वालामुखी विस्फोटाने भारतावर आणले धूसर ढग: १२,००० वर्षांनंतर उदय, विमानसेवा ठप्प, आरोग्य धोका वाढला**

इमेज
**इथियोपियातील ज्वालामुखी विस्फोटाने भारतावर आणले धूसर ढग: १२,००० वर्षांनंतर उदय, विमानसेवा ठप्प, आरोग्य धोका वाढला**  **KDM NEWS प्रतिनिधी**नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२५** – इथियोपियाच्या अफार प्रदेशातील हायली गुभी (Hayli Gubbi) ज्वालामुखीने १२,००० वर्षांच्या निद्रेनंतर उदयास आल्यानंतर त्याच्या राख आणि सल्फर डायऑक्साइडने भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागावर धूसर सावली टाकली आहे. रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८:३० वाजता सुरू झालेल्या या विस्फोटाने १४ किलोमीटर उंचीपर्यंत राखाचे ढग उभे केले, जे रेड सी ओलांडून ओमान, येमेन आणि अरबी समुद्र मार्गे भारतात दाखल झाले. भारत हवामान विभागाने (IMD) सांगितल्याप्रमाणे, हे ढग १००-१२० किमी/तास वेगाने सरकत गुजरात, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात पसरले आहेत. संध्याकाळी ७:३० पर्यंत हे ढग भारत सोडून चीनकडे सरकतील, पण त्यानंतरही प्रदूषणाचे स्तर काही तास कायम राहण्याची शक्यता आहे. हा विस्फोट इथियोपियाच्या डॅनाकिल डिप्रेशनमधील एका शील्ड ज्वालामुखीचा आहे, जो एर्ता अले ज्वालामुखीपासून सुमारे १५ क...

**निमजाई साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला; गव्हाणीत उतरून ठिय्या, ऊस दर व थकीत बिलांसाठी तीव्र आंदोलन**

इमेज
**निमजाई साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला; गव्हाणीत उतरून ठिय्या, ऊस दर व थकीत बिलांसाठी तीव्र आंदोलन**  **KDM NEWS (जिल्हा प्रतिनिधी) २३ नोव्हेंबर २०२५ शेतकऱ्यांच्या संतापाची तीव्रता आज बार्शी तालुक्यातील निमजाई साखर कारखान्यापुढे दिसून आली. ऊसाला किमान ४००० रुपये पहिली उचल, तात्काळ दरजाहीर करणे, मागील हंगामाची थकीत बिले देणे आणि ओव्हरलोड-काटामारी थांबवणे या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे गाळप पूर्णपणे बंद पाडले. सकाळी दहा वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष विजय रनदेवे, तालुकाध्यक्ष हनुमंत कापसे यांच्या नेतृत्वाखाली दीड ते दोन हजार शेतकरी कारखान्यावर धडकले. घोषणाबाजी करीत त्यांनी थेट ऊस गव्हाणीत उड्या मारल्या आणि गाळप यंत्रणा ठप्प केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, तरी शेतकऱ्यांनी गव्हाणीतच ठिय्या मांडला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत गाळप बंदच ठेवले. यावेळी बोलताना शंकरराव गायकवाड यांनी थेट इशारा दिला,   “ऊस उत्पादन खर्च ५५०० ते ६००० रुपये क्विंटलपर्यंत गेलाय. कारखानदार मात्र २७००-२९०० रु...

**बार्शीला बंधुआ मजुरीचा धक्कादायक प्रकार; झारखंडची महिला व चार अल्पवयीन मुले तीन वर्षांपासून डांबून, आरोपी शेतकऱ्यावर बालमजुरी-मानव तस्करीचे गुन्हे दाखल**

इमेज
**बार्शीला बंधुआ मजुरीचा धक्कादायक प्रकार; झारखंडची महिला व चार अल्पवयीन मुले तीन वर्षांपासून डांबून, आरोपी शेतकऱ्यावर बालमजुरी-मानव तस्करीचे गुन्हे दाखल**  **KDM  NEWS प्रतिनिधी बार्शी** २४ नोव्हेंबर २०२५**बार्शी तालुक्यातील चुंब (खडकोनी रोड) येथे एका शेतकऱ्याने झारखंड राज्यातील गरिब कुटुंबाला बंधुआ मजूर म्हणून तीन वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. यात एक महिला व तिची चार अल्पवयीन मुले (वय ९ महिने ते १० वर्षे) यांना शेतात व घरात सक्तीने राबवले जात होते. आरोपी शेतकऱ्याने त्यांना पगार दिला नाही, जेवण-पाणी पुरेसे दिले नाही, मुलांना शाळेत पाठवले नाही आणि मूळ गावी परत जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रामप्रवेश परहिया यांनी २३ नोव्हेंबर रोजी राज्य स्थलांतरित नियंत्रण कक्षाकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. तक्रारीत म्हटले होते की, त्यांची पत्नी सविता देवी (आधार क्र. ३१७३९५३३०६७१) व चार मुले – आयुष कुमार (वय १०), पूनमकुमारी (वय ८), प्रीती कुमारी (वय ५) व पियुष कुमार (वय ९ महिने) यांना बंधुआ मजुरी, बा...

**लग्नाला अवघे १० महिने, पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय अन् डॉ. गौरी गर्जेंनी आयुष्य संपवलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीच्या आत्महत्येनं खळबळ**

इमेज
**लग्नाला अवघे १० महिने, पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय अन् डॉ. गौरी गर्जेंनी आयुष्य संपवलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीच्या आत्महत्येनं खळबळ**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई : भाजप नेत्या तथा महाराष्ट्राच्या पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी अनंत गर्जे (पालवे) (वय २९) यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे ७ वाजता वरळी येथील बीडीडी चाळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नाला अवघे दहा महिने उलटले असतानाच घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडलेल्या या विवाहाला अवघे २८७ दिवस उलटले होते. डॉ. गौरी या मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या दंतवैद्यक विभागात (डेंटल डिपार्टमेंट) कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी होत्या. तर अनंत गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत अत्यंत जवळचे सहकारी म्हणून काम पाहत आहेत.      मानसिक छळ, अनैतिक संबंधाचा संशय अन् सततचे भांडण गौरीच्या...

**सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर जीप उलटली; तीन तरुणींचा मृत्यू, १२ जण जखमी**

इमेज
**सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर जीप उलटली; तीन तरुणींचा मृत्यू, १२ जण जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर** : नळदुर्ग येथील खंडोबा देवस्थानाच्या दर्शनासाठी निघालेल्या ऊळेगाव व हडपसर येथील नातेवाइकांच्या क्रुझर जीपला (क्र. MH-24/V-4948) शनिवारी सकाळी अंदाजे ११.३० वाजता चिवरी फाटा (ता. दक्षिण सोलापूर) जवळ भीषण अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर जीपचा पुढचा टायर फुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटून पलटी झाले. यात तीन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले. मृत तरुणींची नावे   १. पूजा हरी शिंदे (वय ३०, रा. ऊळेगाव, ता. बार्शी)   २. सोनाली माऊली कदम (वय २२, रा. हडपसर, सोलापूर)   ३. साक्षी बडे (वय १९, रा. हडपसर, सोलापूर) गंभीर व किरकोळ जखमी (१२)   कुणाल लक्ष्मण भिसे, अंजली रवी अमराळे, आकाश दत्ता कदम, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, बालाजी शिंदे, माऊली कदम, हरी शिंदे, कार्तिक अमराळे, कार्तिकी अमराळे, शिवांश कदम, श्लोक शिंदे. अपघात इतका भीषण होता की, जीपमधील काही प्रवा...

**बार्शीकरांचा संताप अनावर! सुयश विद्यालयाची स्कूल बस थेट उघड्या गटारीत; ३० मुले बालंबाल बचावली**

इमेज
**बार्शीकरांचा संताप अनावर! सुयश विद्यालयाची स्कूल बस थेट उघड्या गटारीत; ३० मुले बालंबाल बचावली**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, २२ नोव्हेंबर २०२५**आज सकाळी साडेनऊ वाजता बाळेश्वर नाका ते तांदुळवाडी रोडवरील वळणावर खळबळजनक घटना घडली. बार्शीतील नामांकित खासगी शाळा असलेल्या सुयश विद्यालयाची स्कूल बस (क्र. MH-४४/एए ८४७१) थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारीत कोसळली. बसचं पुढचं चाक गटारीत अडकल्याने बस एका बाजूला कलली आणि काही क्षणांसाठी ती उलटण्याचीच भिती निर्माण झाली. बसमध्ये प्री-प्रायमरी ते सातवीच्या सुमारे २८ ते ३० मुले होती.  सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने त्वरेने ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला. तरीही बस कलल्याने काही मुलांना किरकोळ मार लागला, तीन मुले घाबरून रडू लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बस बाजूला करून सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच बार्शी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. #### सुयश विद्यालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड   सूत्रांच्या माहितीनुसार, ही बस रोजच हाच मार्ग वापरते. रस्त्याच्या दुतर्फा उघडी गटारे आण...

**सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट : अस्वच्छ शौचालय अन् पाणपोई प्रकरणी आगार व्यवस्थापकाला जोरदार फटकार**

इमेज
**सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट : अस्वच्छ शौचालय अन् पाणपोई प्रकरणी आगार व्यवस्थापकाला जोरदार फटकार**  **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर : प्रतिनिधी**दि. २२ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी आज दुपारी अचानक सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली. अगदी अनौपचारिक पद्धतीने आलेल्या मंत्र्यांनी थेट प्रवासी सुविधा केंद्रांची पाहणी केली आणि त्यांना जे दृश्य दिसले त्यामुळे त्यांचा पारा चांगलाच तापला. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवरून मंत्री सरनाईक थेट शौचालयाकडे गेले. तेथे प्रचंड अस्वच्छता, टूथपेस्टचे डाग, पिचकार्‍या बंद, पाणी गळती, तुंबलेले कमोड आणि प्रचंड दुर्गंधी यांचा भडका उडाला होता. जवळच्या पाणपोई परिसरातही प्लास्टिकच्या बाटल्या, पानांच्या पीकांचे डाग आणि घाणीचे साम्राज्य दिसत होते. महिलांनी मंत्र्यांकडे थेट तक्रार केली की, “शौचालयाच्या देखभालीसाठी नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराकडून १० ते २० रुपये आकारले जातात, पण सुविधा मात्र शून्य!” या तक्रारीची दखल घेत मंत्र्यां...

**बार्शी-कोल्हापूर हायकोर्ट स्पेशल बससेवा उद्यापासून धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा**

इमेज
**बार्शी-कोल्हापूर हायकोर्ट स्पेशल बससेवा उद्यापासून धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बार्शी ते कोल्हापूर अशी थेट हायकोर्ट स्पेशल बससेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्यापासून म्हणजेच शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता बार्शी बस स्थानकातून पहिली बस रवाना होणार असून, याचा शुभारंभ औपचारिक सोहळ्यात होणार आहे. बार्शी, धाराशिव, लातूर परिसरातील असंख्य नागरिकांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठात (बेंच) कामानिमित्त नियमित ये-जा करावी लागते. आतापर्यंत खाजगी वाहनं किंवा बदलून प्रवास करावा लागत होता. ही नवीन सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे.  **बसचे वेळापत्रक व मार्ग : दिशा : बार्शी → कोल्हापूर   निघणे : सकाळी ६.०० वाजता (बार्शी बसस्थानक)   मार्ग : बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - मंगळवेढा - जत - मिरज - जयसिंगपूर - हातकणंगले - कोल्हापूर ...

**भारतात CNAP सुरू: आता कॉल येताच स्क्रीनवर दिसेल आधारकार्डावरील खरे नाव, ट्रूकॉलरची राजकीय संपुष्टात येणार?**

इमेज
**भारतात CNAP सुरू: आता कॉल येताच स्क्रीनवर दिसेल आधारकार्डावरील खरे नाव, ट्रूकॉलरची राजकीय संपुष्टात येणार?**  **KDM NEWS प्रतिनिधी**नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२५**: अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्समुळे त्रास होत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मोठा दिलासा आहे. भारत सरकारने दूरसंचार विभाग (DoT) आणि ट्राय (TRAI)च्या माध्यमातून 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' (CNAP) प्रणालीचा पहिला टप्पा काही भागांत सुरू केला आहे. यामुळे आता कोणत्याही कॉलरचे आधार-सत्यापित नाव थेट मोबाइल स्क्रीनवर दिसेल – तेही तुमच्या संपर्क यादीतील नावापूर्वी. हे सिस्टम स्पॅम, फसवणूक आणि बनावट कॉल्स रोखण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे, ज्यामुळे तृतीय पक्षाच्या अॅप्ससारख्या ट्रूकॉलरची गरजच संपेल. CNAP चा उद्देश अतिशय स्पष्ट आहे: कॉलरची ओळख पारदर्शक करणे. सध्या चालू असलेल्या कॉलिंग लाईन आयडेंटिफिकेशन (CLI) प्रणालीत फक्त नंबर दिसतो, पण CNAP मध्ये कॉल येताच प्रथम २-३ सेकंदांसाठी आधार किंवा KYC (नो युअर कस्टमर) दस्तऐवजांवर नोंदलेले खरे नाव फ्लॅश होईल. उदाहरणार्थ, जर तुमच्या 'मम्मी'चा नंबर सेव्ह असेल...

**आझाद मैदानावर नव्या फौजदारी कायद्यांचे अनोखे प्रदर्शन; २५ मिनिटांच्या नाट्याद्वारे जनजागृती**

इमेज
**मुंबईः आझाद मैदानावर नव्या फौजदारी कायद्यांचे अनोखे प्रदर्शन; २५ मिनिटांच्या नाट्याद्वारे जनजागृती**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, २१ नोव्हेंबर २०२५ ** भारतातील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लागू झालेल्या तीन महत्त्वाच्या फौजदारी कायद्यांची जनतेला सोपी व प्रभावी माहिती देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गृह विभागाच्या वतीने भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नव्या कायद्यांची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून देशभरात सुरू झाली असून, त्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि काही प्रमाणात संभ्रमही आहे. हा संभ्रम दूर करून कायद्यांची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. प्रदर्शनातील सर्वात आकर्षण ठरत आहे ते २५ मिनिटांचे सादरीकरण-नाट्य. यात कलाकार प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे जुने कलम आणि नवे कलम यातील फरक, नव्या कायद्यांतील महत्त्वाचे बदल, नागरिकांना मिळणारे नवे अधिकार, पोलिसांची नवीन जबाबदारी, ई-एफआयआर, झिरो एफआयआर, व्हिडिओग्राफी अनिवार्यता, ९० दिवसांत...

**महाराष्ट्रात रेशनकार्ड यादीतून १९.४ लाख अयोग्य नावे वगळली; खरे गरजूना फायदा होणार**

इमेज
**महाराष्ट्रात रेशनकार्ड यादीतून १९.४ लाख अयोग्य नावे वगळली; खरे गरजूना फायदा होणार**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, २० नोव्हेंबर : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) राज्यातील रेशनकार्ड यादीतून गेल्या सहा महिन्यांत तब्बल १९ लाख ४० हजार अयोग्य लाभार्थ्यांची नावे कायमस्वरूपी वगळली आहेत. चारचाकी वाहन मालक, उत्पन्न कर भरत असलेले, मृत व्यक्ती, दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले आणि एकाच कुटुंबाची अनेक रेशनकार्डे अशा विविध कारणांमुळे ही नावे काढली गेली. यामुळे राज्यातील एकूण लाभार्थ्यांची संख्या आता ६.९२ कोटींवर आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आधार-ई-केवायसी, उत्पन्न प्रमाणपत्र तपासणी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने डुप्लिकेट व अयोग्य नावे शोधली गेली. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांत सर्वाधिक नावे वगळली गेली आहेत.        जिल्हानिहाय वगळलेली प्रमुख नावे (नोव्हेंबर २०२५...

**नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उद्घाटन : पीडितांना जलद न्यायाची खात्री, गुन्हे सिद्धीचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल - फडणवीस**

इमेज
**नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उद्घाटन : पीडितांना जलद न्यायाची खात्री, गुन्हे सिद्धीचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल - फडणवीस**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, १९ नोव्हेंबर** : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या (भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा) अंमलबजावणीतून पीडितांना विशिष्ट कालावधीत न्याय मिळेल, अशी खात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली. मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी (१९ नोव्हेंबर) पाच दिवसीय प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी न्याय सहाय्यक शाखा, कारागृहे, जिल्हा न्यायालय, अभियोग संचालनालयासह विविध स्टॉल्सची पाहणी करून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पाहिले. प्रदर्शनात या कायद्यांच्या कलमांचे स्पष्टीकरण, डिजिटल पुराव्यांची प्रक्रिया, ऑनलाइन साक्ष नोंदणी आणि गुन्हेगार ट्रॅकिंग सिस्टीमसारख्या घटकांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. फडणवीस यांनी स्टॉल्सवर कार्यरत अधिकारी, वकील आणि तज्ज्ञांशी संवाद साधला. प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत चालेल, ज्यात पोलीस, न्याय...

**जपानमध्ये जपानी भाषा प्रमाणपत्र नसल्यामुळे भारतीय इंजिनियरला दरमहा ११,५०० रुपयांचा दंड; व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ**

इमेज
**जपानमध्ये जपानी भाषा प्रमाणपत्र नसल्यामुळे भारतीय इंजिनियरला दरमहा ११,५०० रुपयांचा दंड; व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ**  **KDM NEWS प्रतिनिधी**टोकियो: जपानमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या भारतीय युवक विक्की कुमारला जपानी भाषेचे ज्ञान प्रमाणित करणारे प्रमाणपत्र नसल्यामुळे दर महिन्याला २०,००० येन (सुमारे ११,५०० रुपये) दंड भरावा लागत आहे. त्याचा महिन्याचा पगार २ लाख ३५ हजार येन (अंदाजे १ लाख ३५ हजार रुपये) असून, या दंडासह इनकम टॅक्स, आरोग्य विमा आणि इतर कपातीनंतर त्याच्या हातात फक्त १ लाख रुपये शिल्लक राहतात. विक्कीचा हा अनुभव सांगणारा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल झाला असून, जपानच्या कठोर भाषा धोरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. २८ वर्षीय विक्की कुमार, जन्माने बिहारचा, गेल्या दोन वर्षांपासून टोकियोतील एका आघाडीच्या टेक कंपनीत कार्यरत आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (jaiswalinjapan) अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे सांगतो, "माझ्या कंपनीने जपानी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली होती. मी प्रयत्न केले, पण JLPT (Japanese Language Pr...

**ऊसाला योग्य दर मिळाला नाही तर कारखानदारांच्या गाड्या जाळू! शेतकऱ्यांचा थेट इशारा**

इमेज
**ऊसाला योग्य दर मिळाला नाही तर कारखानदारांच्या गाड्या जाळू! शेतकऱ्यांचा थेट इशारा**  **KDM NEWS **वैराग/जवळगाव (बार्शी तालुका) प्रतिनिधी, दि. २९ नोव्हेंबर*ऊस उत्पादन खर्च गेल्या दहा वर्षांत जवळपास चौपट झाला तरी साखर कारखान्यांनी ऊसाचा भाव जाहीर करणे टाळले आहे. सिझनला वीस दिवस उलटूनही एकाही कारखान्याने अधिकृत भाव जाहीर केलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. “ऊसाला कमी भाव देणाऱ्या कारखानदारांच्या गाड्या पेटवल्या जातील,” असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला. बार्शी तालुक्यातील जवळगाव (दोन) येथे रविवारी (दि. २८) शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घोषणांना पाठिंबा दिला. शंकरराव गायकवाड पुढे म्हणाले, “राज्यातील बहुतांश साखर कारखाने व गुळपावडर कारखाने गाळपाला सुरुवात करून महिना उलटला तरी भाव जाहीर करत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस कमी भावाने लुटला जातोय. सरकारकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई ह...

**सोलापूरमध्ये बेकायदा शाळा व्हॅन-रिक्षांवर धडाका; ४३ वाहनांवर कारवाई, १.८७ लाखांचा दंड**

इमेज
**सोलापूरमध्ये बेकायदा शाळा व्हॅन-रिक्षांवर धडाका; ४३ वाहनांवर कारवाई, १.८७ लाखांचा दंड**  **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी व्हॅन, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये सुरक्षेच्या नियमांचा मोठ्या प्रमाणात भंग होत असल्याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाने खडा पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनधिकृत आणि अवैध पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४३ वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाने शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत धडक तपासणी केली. सकाळी शाळा सुटण्याच्या वेळी आणि सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी मुख्य रस्ते, उपनगरीय भाग आणि शाळांजवळील परिसरात ही मोहीम तीव्र करण्यात आली होती. या मोहिमेत एकूण १२१ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यात ओव्हरलोडिंग, परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक, फिटनेस सर्टिफिकेट नसणे, वेग मर्यादा डिव्हाइस न बस...

**सोलापूरची मेघा शिवगुंडे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरवनिधी**

इमेज
**सोलापूरची मेघा शिवगुंडे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरवनिधी**  **KDM NEWS प्रतिनिधी** सोलापूर** – महावितरण कंपनीच्या सोलापूर परिमंडळातील गुरुनानक नगर उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता मेघा अशोक शिवगुंडे यांना त्यांच्या कर्तव्यदक्षता, ग्राहकसेवेतील उत्कृष्ट कामगिरी आणि थकबाकी वसुलीतील यशस्वी नेतृत्वासाठी राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न आदर्श पुरस्कार-२०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एन.डी. फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भव्य समारंभात राज्यभरातील निवडक १२५ महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यात सोलापूरच्या मेघा शिवगुंडे यांचा प्रथम क्रमांकाने समावेश आहे. महावितरणमध्ये २०१८ पासून सेवा देत असलेल्या मेघा शिवगुंडे या सोलापूर शहरातील गुरुनानक नगर, विजयपुर रोड, दिनकरनगर आदी भागातील सुमारे १८ हजार वीजग्राहकांच्या सेवेची जबाबदारी सांभाळतात. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उपविभागाचे थकबाकी वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट सलग १०० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण केले आहे. सध्या त्यांच्या उपविभागाची एकूण थकबाकी केवळ ४.८ कोटींवर आणली असून...

**बार्शी : रेल्वे फाटक क्र. १० आज सकाळी ८ पासून उद्या रात्री ८ पर्यंत पूर्णपणे बंद; वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा**

इमेज
**बार्शी : रेल्वे फाटक क्र. १० आज सकाळी ८ पासून उद्या रात्री ८ पर्यंत पूर्णपणे बंद; वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, १९ नोव्हेंबर : मध्य रेल्वेच्या सोलापूर-लातूर मार्गावरील बार्शी टाऊनजवळील महत्त्वाचा समपार फाटक क्रमांक १० (एलसी नं. १०, किलोमीटर ४०८/४-५) आज बुधवारी सकाळी ८.०० वाजल्यापासून ते उद्या गुरुवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत सलग ३६ तास ट्रॅक दुरुस्ती व देखभाल कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत बार्शी_कासरवाडी रोडवरून ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहने थांबवली जातील. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे काम अत्यंत आवश्यक असून ट्रॅकची सुरक्षितता आणि गाड्यांची गती टिकवण्यासाठी ते तातडीने करावे लागत आहे. या फाटकामुळे बार्शी शहर आणि कामारवाडी, सौंदरे, शेंद्री परिसर जोडला जातो. फाटक बंद असताना वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर (र.प.) वाग्मी टाऊन यांनी केले आहे.         पर्यायी मार्ग : - बार्शी ते कासरवाडी/सौंदरे...

**गुटखा व्यापारातील सूत्रधारांवर मकोकाची कुऱ्हाड; नरहरी झिरवाळांचे कडक निर्देश, विधी विभागाकडे प्रस्ताव

इमेज
**गुटखा व्यापारातील सूत्रधारांवर मकोकाची कुऱ्हाड; नरहरी झिरवाळांचे कडक निर्देश, विधी विभागाकडे प्रस्ताव**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, १८ नोव्हेंबर २०२५**: महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही अवैध वाहतुकीने तरुण पिढी धोक्यात सापडली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज कठोर भूमिका घेतली. गुटखा कंपन्यांचे मालक आणि या व्यवसायातील मुख्य सूत्रधारांवर महाराष्ट्र नियंत्रित गुन्हेगारी कायदा (मकोका) लावण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले. विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रालयात झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली गुटखा व पान मसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन व विक्रीविरुद्ध कारवाईसंदर्भात बैठक झाली. यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावा आदी पदार्थांच्या अवैध आयातीवरून शालेय विद्यार्थी व युवकांवर होणाऱ्या आरोग्य धक्क्यांना प्राधान्य देण्यात आले. परराज्यातून येणाऱ्या या कॅन्सरजन्य पदार्थांमुळे सीमावर्ती भागांत (दहिसर, मुलुंड, मालाडसह) व्यसन वाढले असून, याला आळा घालण्या...

**परंडा नगरपरिषदेत राजकीय राडा; सावंत-मोटे गट भिडले, जोरदार दगडफेक**

इमेज
**परंडा नगरपरिषदेत राजकीय राडा; सावंत-मोटे गट भिडले, जोरदार दगडफेक**  **KDM NEWS प्रतिनिधी**परंडा, दि. १८ नोव्हेंबर २०२५** – धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज छाननीदरम्यान सोमवारी (१८ नोव्हेंबर) तीव्र राजकीय वाद उफाळून आला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थक गट आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आमनेसामने येऊन जोरदार दगडफेक झाली. नगरपरिषद भवनात गोंधळ उडाला असून, परिसरात तणावीन आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.        वादाची सुरुवात आणि वाढ निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान सकाळी ११ वाजता हा वाद भडकला. सावंत गटाचे प्रमुख उमेदवार माजी नगराध्यक्ष डॉ. जाकीर सौदागर यांच्या उमेदवारीवर मोटे गटाने आक्षेप नोंदवला. आक्षेपाचे मुख्य कारण सौदागर यांना तीन अपत्य असल्याने आरक्षण नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला. दुसरीकडे, मोटे गटाचे उमेदवार विश्वजीत पाटील यांच्या अर्जावरही सावंत गटाने आक्षेप घेतला, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भ...

**डॉक्टर्स भगवंत क्रिकेट ट्रॉफी २०२५ : डायनॅमिक हिलर संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले**

इमेज
**डॉक्टर्स भगवंत क्रिकेट ट्रॉफी २०२५ : डायनॅमिक हिलर संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. १८ नोव्हेंबर : बार्शीतील महाराजा मैदान, उपळाई रोड येथे रंगलेल्या “डॉक्टर्स भगवंत क्रिकेट ट्रॉफी”च्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात डायनॅमिक हिलर संघाने यूनायटेड जायंट्स संघाचा २ गडी राखून पराभव करीत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. रोमांचा विजय मिळवला. १० षटकांच्या थरारक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूनायटेड जायंट्स संघाने निर्धारित १० षटकांत ३ गडी बाद ९१ धावा उभारल्या. त्यांच्या डावाला आवर घालण्यात डायनॅमिक हिलरच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात डायनॅमिक हिलर संघाने केवळ ८ षटकांत १ गडी गमावून ९२ धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना आपल्या नावे केला. सामन्याची सुरुवात यूनायटेड जायंट्सने आक्रमक केली; मात्र मधल्या षटकांत डायनॅमिक हिलरच्या गोलंदाजांनी विकेट्स घेत सामना फिरवला. लक्ष्याचा पाठलाग करताना डायनॅमिक हिलरच्या फलंदाजांनी संयमी व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत विजय निश्चित केला. अखेरच्या षटकात विजयी चौकार लग...

**महाराष्ट्रात NEP आणि विकसित महाराष्ट्र २०४७ साठी उच्चशिक्षण क्षेत्राचा मेगा रिव्ह्यू; चंद्रकांत पाटील यांचे ठोस निर्देश**

इमेज
**महाराष्ट्रात NEP आणि विकसित महाराष्ट्र २०४७ साठी उच्चशिक्षण क्षेत्राचा मेगा रिव्ह्यू; चंद्रकांत पाटील यांचे ठोस निर्देश**  **KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई | प्रतिनिधी | १७ नोव्हेंबर २०२५**मुंबई विद्यापीठाच्या विस्तारित कॉन्सिल हॉलमध्ये आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. राज्यातील सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि उच्चशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आल्याने ही बैठक महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण क्षेत्रातील टर्निंग पॉईंट ठरली. बैठकीत महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन रोजगारक्षम कौशल्ये (Future-ready Skills) देणे, राज्यातील145 विद्यापीठे आणि हजारो महाविद्यालये NIRF, QS World University Rankings, Times Higher Education यासारख्या रँकिंगमध्ये आघाडीवर आणणे, संशोधन गुणवत्ता वाढवणे आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे आ...

**बायोटेक क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप!डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात स्टेट-ऑफ-द-आर्ट लॅबसाठी बायोएराशी करार**

इमेज
**बायोटेक क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात स्टेट-ऑफ-द-आर्ट लॅबसाठी बायोएराशी करार**  **KDM NEWS प्रतिनिधी**लोणेरे (रायगड), १७ नोव्हेंबर २०२५ *महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राला बायोटेक्नॉलॉजी आणि लाइफ सायन्सेसच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि पुण्यातील बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांच्यात आज अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅबोरेटरी’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार स्वाक्षरी कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. या लॅबमुळे विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना जागतिक दर्जाच्या सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून बायोफार्मास्युटिकल्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, बायोइन्फॉरमॅटिक्स आणि बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी या क्षेत्रांत क्रांतिकारी संशोधनाला चालना मिळणार आहे. या लॅब...

**मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ**

इमेज
**मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ**  KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, १७ नोव्हेंबर २०२५ महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ वरून थेट ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. राज्यातील पूर, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रामीण भागातील हजारो महिलांना e-KYC केंद्रांपर्यंत पोहोचणे कठीण गेले होते, त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सुमारे २.३८ कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असून त्यापैकी २.१५ कोटींहून अधिक महिलांचे e-KYC पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित २० लाखांहून अधिक लाभार्थींचे e-KYC अद्याप बाकी आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही संख्या मोठी आहे. #### विशेष प्रकरणांतील महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना - ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, घटस्फोट झाला आहे किंवा न्यायालयीन आदेशानुसार पो...